शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 09:48 IST

कुर्डूवाडी पोलिसांची कारवाई: धंद्यात प्रगतीसाठी ५० हजार स्वीकारल्याची तक्रार 

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापृर : काळी जादू, लैंगिक शोषणासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे असलेल्या भोंदू मनोहरमामा भोसले याला चौकशीसाठी कुर्डूवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी दुपारी पुण्यात मांजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

पोलिस सूत्रांनुसार, यातील मनोहर भोसले याने एका व्यापाऱ्यास धंद्यात प्रगती करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यातील ५० हजार रुपये स्वीकारून आपली फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली. त्यानुसार कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते त्यांच्या पथकासह पुण्याला रवाना झाले होते. शुक्रवारी (दि. २४) पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुपारी २ च्या सुमारास मनोहर भोसलेसह (रा. उंदरगाव, ता. करमाळा) त्याचा साथीदार विशाल वाघमारे (रा. मांजरी) या दोघांना ताब्यात घेऊन सायंकाळी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

आज माढा न्यायालयात 

मनोहर भोसले व त्याचा साथीदार विशाल वाघमारे या दोघांना माढा न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांनी सांगितले.

साथीदारांसह महिलांचे शोषण: मनोहरमामावर आश्रमात साथीदारांसह महिलांचे शोषण केल्याचा आरोप असून, करमाळा पोलिसांनी बलात्कार प्रकरणात त्याला ताब्यात घेतले आणि १९ सप्टेंबर २०२१ रोजी करमाळा न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. नंतर न्यायालयीन कोठडीत मिळाली होती.

बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगायचा स्वत:ला  बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी  करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील भोंदूबाबा मनोहरमामा भोसले याच्याविरुद्ध ९ सप्टेंबर २०२१ मध्ये करमाळा पोलिस ठाण्यात  गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात त्याला करमाळा न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. तो घोटीच्या आश्रमातून दर अमावास्या-पौर्णिमेला भविष्य बघायचा.मी कर्करोग बरा करतो, असे खोटे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा विकत घ्यायला लावून त्याने बारामतीच्या शशिकांत खरात यांच्याकडून २ लाख ५१ हजार रुपये उकळल होते. या प्रकरणात बारामती पोलिसांकडून भोंदूबाबा मनोहरमामाला अटक झाली होती.  उंदरगाव ता. करमाळा येथील मठात पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Manohar Bhosale, Fake Baba Arrested for Black Magic, Fraud

Web Summary : Manohar Bhosale, accused of black magic, sexual exploitation, and fraud, was arrested in Pune. He allegedly extorted money from a businessman promising progress. Bhosale faces prior charges, including sexual assault and exploiting women at his ashram.
टॅग्स :SolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्र