शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:01 IST

Beed Jail: बीड येथील वर्ग-२ चे मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  बीड: येथील वर्ग-२ चे मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कैद्यांनी नियमानुसार बाहेर केलेल्या कॉलचे कथित रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी नवी क्लिप व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजकीय वादाशी जोडले जात असल्याचे दिसत आहे.

१६२ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात कायम दुप्पट कैदी असतात. यात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले गँग आणि कुख्यात गुन्हेगार सनी आठवले यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा समावेश आहे. कारागृहात दोन गटांत सुरू असलेली वर्चस्वाची लढाई आता ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून बाहेर येत आहे. 

सलग ३ दिवस ‘व्हायरल’ सत्र

पहिली क्लिप : तीन दिवसांपूर्वी अजहर पठाण याने सुदर्शन घुले टोळीवर मारहाणीचा आरोप करणारी क्लिप व्हायरल झाली.दुसरी क्लिप : दुसऱ्याच दिवशी पठाणने ‘यू-टर्न’ घेत जेल कर्मचाऱ्याच्या दबावाखाली आपण असे बोलल्याची क्लिप व्हायरल झाली. तिसरी क्लिप : शुक्रवारी पुन्हा सनी आठवलेची कथित क्लिप व्हायरल झाली, ज्यात तो मारहाणीचा पुनरुच्चार करताना ऐकू येतो. कैदी कॉन्फरन्स कॉलचा वापर करून हे रेकॉर्डिंग करीत असल्याचा संशय आहे.

राजकीय कनेक्शन आणि ‘मस्साजोग’ प्लॅन

अजहर पठाणने कारागृह प्रशासनाला दिलेल्या पत्रात खळबळजनक दावा केला आहे. मस्साजोग सरपंच पदाची निवडणूक सुरू असून, वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगला बदनाम करण्यासाठी कुख्यात दादा खिंडकर याने हा ‘प्री-प्लॅन’ आखल्याचा संशय पठाणने व्यक्त केला आहे. 

आयजींचे पथक बीडमध्ये 

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महानिरीक्षक कार्यालयाकडून विशेष पथक बीडमध्ये दाखल झाले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Jail Scandal: Inmate Call Recordings Leaked, Sparking Controversy and Investigation

Web Summary : Beed jail faces scrutiny as inmate call recordings go viral, revealing gang rivalries. Allegations of coercion and political connections surface, prompting an investigation by the Inspector General's office. The leaks involve notorious criminals and claims of election manipulation.
टॅग्स :BeedबीडjailतुरुंगMaharashtraमहाराष्ट्र