Join us
Daily Top 2Weekly Top 5

'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी

Virat Kohli Sai Sudarshan RCB vs GT IPL 2026: गतविजेत्या बंगळुरूचा गुजरातविरुद्ध ५ गड्यांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 08:43 IST

Open in App

Virat Kohli Sai Sudarshan RCB vs GT IPL 2026: मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला 'चेज मास्टर' का म्हटले जाते, हे विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केले. कोहलीने ४४ चेंडूंत ८ चौकार व ४ षट्‌कारांसह ८१ धावांची दमदार खेळी करीत बंगळुरूला शुक्रवारी गुजरातविरुद्ध ५ गड्यांनी विजय मिळवून दिला. गुजरातला २० षट्‌कोत ३ बाद २०५ धावांवर रोखल्यानंतर बंगळुरूने १८.५ षट्‌कांत ५ बाद २०६ धावा केल्या. गुजरातच्या साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ ठरले.

लक्ष्याचा पाठलाग करताना कोहली शून्यावर असताना वॉशिंग्टन सुंदरने त्याचा सोपा झोल सोडला. हा या सामन्यातील निर्णायक क्षण ठरला. या जीवदानाचा फायदा घेत कोहलीने अप्रतिम फलंदाजी करीत गुजरातच्या हातातून सामना हिसकावून घेतला. त्याला चांगली साथ देत देवदत्त पडिक्कलनेही २० चेंडूत आक्रमक अर्धशतक इाळकावले. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ५९ चेंडूंत ११५ धावांची भागीदारी करीत संघाचा विजय स्पष्ट केला; परंतु ३२ धावांत ५ बळी गेल्याने बंगळुरूचा डाव १ बाद १४१ धावांवरून ५ बाद १७३ धावा असा घसरला. टिम डेव्हिड आणि कृणाल पांड्या यांनी २० चेंडूंत नाबाद ३३ धावांची भागीदारी करीत बंगळुरूला विजयी केले.

त्याआधी, साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या जोरावर गुजरातने भक्कम धावसंख्या उभारली. सुदर्शनने ५८ चेंडूंत ११ चौकार व ५ षट्‌कारांसह १०० धावा केल्या. ७६ चेंडूंत १२८ धावांची सलामी देत सुदर्शन-गिल यांनी गुजरातला भक्कम सुरुवात करून दिली. सुदर्शनने या भागीदारमध्ये तब्बल ९२ धावा कुटल्या. साई सुदर्शन याने सर्वांत कमी ४७डावांमध्ये २ हजार आयपीएल धावा पूर्ण करताना ख्रिस गेलचा (४८ डाव) विक्रम मोडला. साई सुदर्शनने १ हजार ३६१ चेंडूंमध्ये २ हजार आयपीएल धावा पूर्ण केल्या. कमी चेंडूंत अशी कामगिरी करणारा तो सहावा फलंदाज ठरला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्यामध्ये साई सुदर्शन, शुभमन गिल यांनी आठव्यांदा शतकी भागीदारी करीत तिसरे स्थान मिळवले. विराट कोहली-एबी डीव्हिलियर्स यांनी सर्वाधिक दहा, तर विराट कोहली-ख्रिस गेल यांनी नवव्यांदा अशी कामगिरी केली आहे.

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी आयपीएलमध्ये गुजरातकडून कोणत्याही गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारी केली. सर्वांत कमी ४७डावांमध्ये तीन आयपीएल शतक झळकावत साई सुदर्शन याने जोस बटलरला (७० डाव) मागे टाकले.

सामनावीर विराट कोहली - ८१ धावा (४४ चेंडू), ८ चौकार, ४ षटकार

English
हिंदी सारांश
Web Title : Kohli's brilliance overshadows Sai Sudarshan's century; RCB dominates Gujarat.

Web Summary : Virat Kohli's masterful 81 powered RCB to victory against Gujarat, despite Sai Sudarshan's impressive century. Kohli's innings, coupled with Devdutt Padikkal's aggressive fifty, secured the win even after a mid-innings wobble. Earlier, Sudarshan and Gill's opening partnership set a strong foundation for Gujarat.
टॅग्स :आयपीएल २०२६विराट कोहलीगुजरात टायटन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर