IPL 2026 DC vs PBKS Punjab Kings complete highest run chase in T20 cricket history : प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगच्या वादळी खेळीनंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या आश्वासक अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत नवा इतिहास रचला आहे. अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ठेवलेले २६५ धावांचे लक्ष्य पंजाबच्या संघाने ६ विकेट्स आणि ७ चेंडू राखून पार केले. दुसरीकडे लोकेश राहुल आणि नितीश राणा यांची धमाकेदार खेळी व्यर्थ ठरली. यंदाच्या हंगामातील विजयाचा सिलसिला कायम ठेवताना पंजाब किंग्स टी-२० क्रिकेटमधील चेज मास्टर असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. याआधी छोट्या फॉरमॅटमध्ये मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम हा पंजाब किंग्सच्या नावेच होता. आपलाच विक्रम मोडीत काढत पंजाबच्या संघाने नवा इतिहास रचला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
DC च्या ताफ्यातून KL राहुलची विक्रमी खेळी
पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची सुरुवात खराब झाली. पथुम निसंका ७ चेंडूत ११ धावा करून माघारी फिरला. त्यानंतर केएल राहुल आणी नितीश राणा जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९५ चेंडूत २२० धावांची भागीदारी रचली. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली. नितीश राणाने ४४ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९१ धावांचे योगदान दिले. लोकेश राहुलनं ६७ चेंडूत १६ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद १५२ धावांची विक्रमी खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावरच दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं निर्धारित २० षटकात २ बाद २६४ धावा केल्या होत्या.
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
प्रियांश-प्रभसमिरन सिंगच्या फटकेबाजीनंतर श्रेयस अय्यरचा जलवा
या धावंसख्येचा पाठलाग करताना प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. पॉवर प्लेमध्ये पंजाबच्या अनकॅप्ड भारतीय जोडीनं पॉवर प्लेमध्ये ११६ धावा कुटल्या. IPL च्या इतिहासातील पॉवरप्लेमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली. पहिल्या विकेसाठी पंजाबच्या जोडीनं ४१ चेंडूत १२६ धावांची भागीदारी करत दिल्लीच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. प्रियांश आर्य १७ चेंडूत ४३ धावा केल्या. प्रभसिमरन सिंगनं २६ चेंडूतील ७६ धावांच्या वादळी खेळीसह सामना पंजाबच्या बाजूनं सेट केला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यनं आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवत ३६ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने नाबाद ७१ धावा करत संघाचा विजय निश्चित करणारी खेळी साकारली.
Web Summary : Punjab Kings achieved the highest T20 run chase, surpassing Delhi Capitals' 264. Rahul's 152 and Rana's 91 were in vain as Priyansh, Prabhsimran, and Iyer powered Punjab to victory, showcasing their 'chase master' status.
Web Summary : पंजाब किंग्स ने टी20 का सबसे बड़ा रन चेज किया, दिल्ली कैपिटल्स के 264 रनों को पार किया। राहुल के 152 और राणा के 91 रन बेकार गए क्योंकि प्रियांश, प्रभसिमरन और अय्यर ने पंजाब को जीत दिलाई, और 'चेज मास्टर' का दर्जा दिखाया।