छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून जनसामान्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत, धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्याविरोधात मराठा मावळा संघटनेने शनिवारी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बाबांनी मांडलेला इतिहास हा शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा असून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
"इतिहासाची मोडतोड खपवून घेणार नाही"मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांची भेट घेतली. "धीरेंद्र शास्त्री यांनी रामदास हे शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहेत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असून शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही," अशा भावना प्रा. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
तीव्र आंदोलनाचा इशाराया तक्रारीत म्हटले आहे की, बागेश्वर बाबा सातत्याने वादग्रस्त विधाने करून समाजाची दिशाभूल करत आहेत. जर पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल केला नाही, तर शहरात आणि जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी हनुमंत कदम, भरत कदम, संजय गायके, सुनीता पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Web Summary : Bageshwar Baba faces complaint in Chhatrapati Sambhajinagar for allegedly distorting Shivaji Maharaj's history and hurting sentiments. Maratha Mawla organization demands immediate action, threatening protests if police fail to register a case.
Web Summary : शिवाजी महाराज के इतिहास को कथित तौर पर विकृत करने और भावनाओं को ठेस पहुंचाने के लिए बागेश्वर बाबा के खिलाफ छत्रपति संभाजीनगर में शिकायत दर्ज की गई। मराठा मावला संगठन ने तत्काल कार्रवाई की मांग की, पुलिस द्वारा मामला दर्ज करने में विफल रहने पर विरोध प्रदर्शन की धमकी दी।