IPL 2026 Prabhsimran Singh smashes six fours to Mukesh Kumar : अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात धावांसह विक्रमांची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. केएल राहुल १५२ (६७) आणि नितीश राणा ९१ (४४) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २ विके्सच्या मोबदल्यात २६४ धावा करत पंजाब किंग्ससमोर तगडे आव्हान दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी तुफान फटकेबाजी करत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीनं पॉवर प्लेमध्ये ११६ धावा कुटल्या. IPL च्या इतिहासातील पॉवरप्लेमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रभसिमरन सिंगचं शतक हुकले, पण...
प्रियांश आर्य १७ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४३ धावांची खेळी करुन परतल्यावर प्रभसिमरन सिंगने आपला धमाकेदार शो कायम ठेवला. तो या सामन्यात शतकाला गवसणी घालेल, असे वाटत होते. पण कुलदीप यादवनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. शतक हुकले असले तरी प्रभसिमरन सिंग याने २६ ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७६ धावांची खेळी करताना खास विक्रमाला गवसणी घातली.
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
एकाच षटकात ६ चौकार! प्रभसिमन सिंगनं केली अजिंक्य आणि पृथ्वीची बरोबरी
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरन सिंग याने पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकात मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर ६ चेंडूवर ६ चौकार मारले. याआधी २०१२ च्या हंगामात अजिंक्य रहाणे याने आरसीबीच्या ताफ्यातील श्रीनाथ अरविंद याच्या गोलंदाजीवर एका षटकात ६ चौकार मारले होते. २०२१ च्या हंगामात दिल्लीच्या ताफ्यातून खेळताना पृथ्वी शॉनं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात शिवम मावेची अशी धुलाई केली होती.
Web Summary : In the DC vs PBKS match, Prabhsimran Singh's aggressive batting, including six fours in an over, matched records held by Ajinkya Rahane and Prithvi Shaw. Despite Rahul and Rana's heroics, his innings was a highlight.
Web Summary : दिल्ली कैपिटल्स बनाम पंजाब किंग्स मैच में प्रभसिमरन सिंह की तूफानी बल्लेबाजी, जिसमें एक ओवर में छह चौके शामिल थे, ने रहाणे और पृथ्वी शॉ के रिकॉर्ड की बराबरी की। राहुल और राणा के शानदार प्रदर्शन के बावजूद, उनकी पारी मुख्य आकर्षण रही।