शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 18:45 IST

Pune Crime : या घटनेमुळे २०१२ मधील कुप्रसिद्ध संतोष माने प्रकरणाची आठवण ताजी झाली. २५ जानेवारी २०१२ रोजी संतोष माने याने स्वारगेट येथून एसटी बस पळवून शहरात भीषण हल्ला केला होता.

- किरण शिंदेपुणे -  शहरातील डेक्कन परिसरात शनिवारी दुपारी मोठा थरार पाहायला मिळाला. एका मद्यधुंद व्यक्तीने सार्वजनिक वाहतुकीची बस पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. महाराष्ट्र बँक चौकाजवळून सुरू झालेला हा प्रकार गुडलक चौक, कारंजी मार्गे पुन्हा डेक्कन बस स्थानकापर्यंत पोहोचला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 अधिकच्या माहितीनुसार,  कलाकार कट्ट्यावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे त्या भागात पोलीस आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून संबंधित बस अडवली आणि चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.या घटनेमुळे २०१२ मधील कुप्रसिद्ध संतोष माने प्रकरणाची आठवण ताजी झाली. २५ जानेवारी २०१२ रोजी संतोष माने याने स्वारगेट येथून एसटी बस पळवून शहरात भीषण हल्ला केला होता. त्या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर २७ जण जखमी झाले होते. तसेच अनेक वाहनांचेही मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने, डेक्कनमधील ताज्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Drunk man attempts bus hijacking, echoes 2012 incident.

Web Summary : A drunk man hijacked a bus in Pune, reminiscent of the 2012 Santosh Mane tragedy. Police swiftly intervened, preventing casualties. An investigation is ongoing.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र