Join us
Daily Top 2Weekly Top 5

DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?

DC vs PBSK यांच्यातील सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 18:17 IST

Open in App

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्धच्याआयपीएल २०२६ च्या सामन्यादरम्यान डोक्याला दुखापत झाल्याने दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनिग्डीला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. पंजाब किंग्सच्या डावाच्या तिसऱ्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर झेल घेताना तो दुखापतग्रस्त झाला. 

नेमकं काय घडलं?

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्याती दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज पीबीकेएसचा सलामीवीर प्रियांश आर्याला बाद करण्याच्या प्रयत्नात मिड-ऑफवरून मागे सरकत होता. डोक्यावरून जाणाऱ्या चेंडूपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात, त्याचा तोल गेला आणि त्याचे डोके जमिनीवर आदळले. त्याला तात्काळ वेदना होऊ लागल्या, तो अस्वस्थतेने आपले डोके धरून बसला आणि बराच वेळ जमिनीवर  पडून राहिला. ॲम्ब्युलन्समधून त्याला रुग्णालयात नेण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या जागी  श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुशमंथा चमीरा बदली खेळाडूच्या रुपात मैदानात उतरला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Serious Injury to Player During DC vs PBKS IPL Match!

Web Summary : During the DC vs PBKS IPL match at Delhi's Arun Jaitley Stadium, DC bowler Lungi Ngidi suffered a head injury while attempting a catch. He was stretchered off the field after hitting his head hard on the ground.
टॅग्स :आयपीएल २०२६दिल्ली कॅपिटल्सपंजाब किंग्स