शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 19:15 IST

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राघव चड्ढा यांना इंस्टाग्रामवर मोठा फटका बसला आहे.

राजकारणातील युथ आयकॉन आणि ग्लॅमरस चेहरा म्हणून ओळखले जाणारे राघव चड्ढा यांना सोशल मीडियावर मोठा धक्का बसला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच अवघ्या ४८ तासांत तब्बल ११ लाख लोकांनी त्यांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. 'आप'शी केलेली गद्दारी तरुणाईला रुचलेली नसल्याचेच या आकडेवारीवरून दिसत आहे.

१४.६ वरून १३.५ मिलियनवर घसरण!

२३ एप्रिलपर्यंत राघव चड्ढा यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या १४.६ मिलियन इतकी होती. मात्र, २४ एप्रिल रोजी त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यावर फॉलोअर्स वेगाने कमी होऊ लागले. सध्या ही संख्या १३.५ मिलियनवर आली असून, ती अजूनही सातत्याने घटत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लोक राघव यांना अनफॉलो करतानाचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

'Gen Z' का झाला नाराज?

राघव चड्ढा यांनी संसदेत गिग वर्कर्सचे प्रश्न, एअरपोर्टवरील महागडे समोसे आणि १० मिनिटांत होणारी डिलिव्हरी यांसारख्या तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आवाज उठवला होता. अगदी स्वतः डिलिव्हरी बॉय बनून त्यांनी तरुणांची मने जिंकली होती. मात्र, भाजपमध्ये जाताच त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधातील आपल्या जुन्या पोस्ट डिलीट केल्या. हीच गोष्ट त्यांच्या चाहत्यांना खटकली आहे. "राघव यांनी तत्त्वांपेक्षा सत्तेला महत्त्व दिले," अशी भावना सोशल मीडिया युजर्स व्यक्त करत आहेत.

नेत्यांपासून गिर्यारोहकांपर्यंत सर्वांचाच पाठ फिरवला

केवळ सामान्य जनताच नाही, तर अनेक क्षेत्रांतील नामवंतांनीही राघव यांची साथ सोडली आहे. विना ऑक्सिजन माऊंट एलब्रस सर करण्याचा विक्रम प्रस्थापित करणारे प्रसिद्ध गिर्यारोहक रोहताश खिलेरी यांनीही राघव यांना अनफॉलो केले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनीश गवांडे यांनीही टोला लगावला की, "इंटरनेट तुम्हाला रातोरात हिरो बनवू शकते आणि रातोरात झिरो देखील!"

'#UnfollowRaghavChadha' ट्रेंडिंगवर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर सध्या #UnfollowRaghavChadha हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 'आप'चे नेते सौरभ भारद्वाज यांनी टीका केली की, राघव यांच्या टाइमलाइनवर आता मोदींच्या स्तुतीव्यतिरिक्त काहीच उरलेले नाही. एकेकाळी स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करू पाहणारा हा तरुण नेता आता भाजपच्या लाटेत आपली लोकप्रियता गमावताना दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Raghav Chadha's Popularity Plummets After Joining BJP; Millions Unfollow

Web Summary : Raghav Chadha faced a social media backlash after joining BJP. Over 1.1 million Instagram followers unfollowed him within 48 hours. His perceived betrayal of AAP and deletion of anti-Modi posts angered many, including celebrities, leading to the #UnfollowRaghavChadha trend.
टॅग्स :Raghav Chadhaराघव चड्ढाBJPभाजपा