शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 06:06 IST

आम्ही साधू, संतांचा आदर करतो व भविष्यातदेखील करू. मात्र, शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध आहे असं राजे मुधोजी भोसले यांनी म्हटलं.

नागपूर -  बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संतापाचे वातावरण आहे. येथील भोसले राजघराण्यातील राजे मुधोजी भोसले यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात चुकीचे वक्तव्य खपवून घेणार नाही. महाराजांच्या पुण्याईमुळे आज ते बागेश्वर बाबा आहेत अन्यथा मौलवी बाबा राहिले असते, या शब्दांत त्यांनी टीका केली.

श्री आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारा प्रस्तावित भारतदुर्गा शक्ती स्थळाच्या जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात शिलान्यास सोहळ्यादरम्यान शुक्रवारी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. 

वादग्रस्त वक्तव्य कशाला?उत्तर भारतातून एनसीईआरटीची सुपारी घेतल्याच्या आविर्भावात महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांबाबत शास्त्री यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. महाराजांनी देव, देश आणि धर्मासाठी आयुष्य वेचले हेच सत्य आहे. जे लोक स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवतात, तेच महाराजांबद्दल वादग्रस्त आणि चुकीची विधाने करत आहेत. आम्ही साधू, संतांचा आदर करतो व भविष्यातदेखील करू. मात्र, शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध आहे. - राजे मुधोजी भोसले

हा शिवरायांचा अपमान; माफी मागा : सपकाळबागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यात गुरू शिष्याचे नाते होते असे निखालस खोटे विधान केले असून त्यांनी तसेच या विधानावेळी उपस्थित असलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पत्रपरिषदेत केली. धीरेंद्र शास्त्री भोंदूबाबा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून असा अपमान करणे हे भाजप- संघाचे राष्ट्रीय धोरण आहे. महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.  राज्यभरात या विरोधात तीव्र संताप आहे. शिवाजी महाराजांबद्दल अशी अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करत नसल्याने चुकीचा संदेश जात आहे, असे सपकाळ म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bageshwar's Dhirendra Shastri faces criticism for Shivaji Maharaj statement.

Web Summary : Dhirendra Krishna Shastri's remarks on Shivaji Maharaj sparked outrage. Mudhoji Bhosle criticized Shastri, stating his fame is due to Shivaji's legacy. Congress demands apology from Shastri, Bhagwat, Fadnavis, and Gadkari, deeming the statement an insult; Maharashtra will not tolerate this.
टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज