मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई आणि पुणे यांच्यादरम्यानचे अंतर आणि प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या “मीसिंग लिंक” प्रकल्पाचे लोकार्पण १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी होणार आहे. त्यामुळे हा प्रवास करणाऱ्यांची आता खंडाळा घाटातील कोंडीतून सुटका होणार आहे.
मुंबई ते पुण्यादरम्यान यशवंतराव चव्हाण महामार्गावरून सध्या खंडाळा घाटातून प्रवास करावा लागतो. या ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होते. लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही अनेकदा या वाहतूक कोंडीत कित्येक तास अडकून पडावे लागते.
कोंडीजाचातून होणार सुटकापावसाळ्यात या मार्गावर दरडी कोसळण्याच्या प्रकार घडतात. तसेच अपघाताच्या घटनाही घडतात. यावर पर्याय म्हणून मीसिंग लिंक या १३.३ किमी लांबीच्या मार्गाची उभारणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केली आहे. आता या प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गाचे १ मे रोजी लोकार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्पाची कामे ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू झाली. यापूर्वी हा मार्ग डिसेंबर २०२३ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, कोविडनंतर आलेल्या अडचणी आणि खंडाळा घाटातील मुसळधार पाऊस आणि वेगवान वारा यात काम करणे आव्हानात्मक होते. या मार्गाच्या कामाला विलंब झाला. एमएसआरडीसीने ६,६९५ कोटी रुपये खर्चून हा भुयारी मार्ग तयार केला आहे. हा मार्ग सुरू झाल्यावर लोणावळा घाटातील कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे. तसेच जगातील सर्वांत रुंद बोगदा मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Web Summary : The Mumbai-Pune Missing Link project, set to open May 1st, will reduce travel time by 30 minutes and bypass Khandala traffic jams. The 13.3 km route, costing ₹6,695 crores, will ease congestion and prevent accidents, offering a smoother journey.
Web Summary : मुंबई-पुणे मिसिंग लिंक परियोजना, 1 मई को खुलने के लिए तैयार है, यात्रा के समय को 30 मिनट कम कर देगी और खंडाला ट्रैफिक जाम को बाईपास कर देगी। ₹6,695 करोड़ की लागत वाला 13.3 किमी का मार्ग, भीड़भाड़ को कम करेगा और दुर्घटनाओं को रोकेगा, जिससे एक आसान यात्रा होगी।