शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 07:26 IST

गोळीबाराच्या आवाजामुळे हॉटेलमध्ये गोंधळ माजला. पत्रकार आणि पाहुण्यांना लपण्यासाठी टेबलाखाली जावे लागले

वॉशिंग्टन - व्हाइट हाऊस कॉरेस्पॉडेंट्स डिनर कार्यक्रमात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच गोळीबाराची घटना घडल्याने अमेरिकेत खळबळ माजली आहे. या घटनेमुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच उपराष्ट्रपती जे.डी व्हान्स आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यादेखील हजर होत्या. 

या कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तातडीने राष्ट्रपती ट्रम्प यांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढले. गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यात हा गोळीबार ट्रम्प यांच्या समोरच झाल्याचे दिसून येते. डोनाल्ड ट्रम्प व्यासपीठावर बसले होते तेव्हा अचानक गोळीबार होतो. त्यानंतर सुरक्षा जवान ट्रम्प यांच्या भोवती कवच निर्माण करतात. अनेक लोक टेबलाखाली लपून बसतात. या कार्यक्रमात २६०० लोक जमले होते. गोळीबारामुळे अनेकांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सुरक्षित कोपरा शोधला. 

गोळीबाराच्या आवाजामुळे हॉटेलमध्ये गोंधळ माजला. पत्रकार आणि पाहुण्यांना लपण्यासाठी टेबलाखाली जावे लागले. सुरक्षा जवानांनी त्यानंतर तातडीने सूत्रे हाती घेत हॉटेल रिकामे केले. या घटनेतील संशयिताला घटनास्थळी पकडले असून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याचं बोलले जाते. या घटनेबाबत ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात लिहिलंय की, आज संध्याकाळी डीसीमध्ये खूप धावपळ होती. सीक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा यंत्रणांनी उत्कृष्ट काम केले. त्यांनी मोठे शौर्य आणि चपळाई दाखवली. गोळीबार करणाऱ्याला पकडण्यात आले आहे. मी कार्यक्रम सुरू ठेवण्याची शिफारस केली आहे, परंतु पुढील निर्णय पूर्णपणे सुरक्षा यंत्रणांच्या निर्णयावर अवलंबून असतील. निर्णय काहीही असो, आजची संध्याकाळ अपेक्षेप्रमाणे नव्हती आणि आम्हाला तो कार्यक्रम पुन्हा आयोजित करावा लागेल असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संपूर्ण हिल्टन हॉटेल आणि आजूबाजूचा परिसर सील केला. हे हॉटेल पूर्णपणे रिकामे करण्यात आले. सुरक्षा कर्मचारी प्रत्येक फुटेजची तपासणी करत आहेत. ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना सुरक्षितपणे व्हाईट हाऊसमध्ये हलवण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shots fired near Trump at dinner; suspect apprehended in US.

Web Summary : Chaos erupted at a White House Correspondents' Dinner as shots rang out near President Trump. Security swiftly moved Trump and his wife to safety. A suspect is in custody, and investigations are ongoing. Trump confirmed his safety via social media.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पFiringगोळीबार