शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 06:41 IST

टोफूमधील अँटिऑक्सिडंटस्मुळे शरीरात तयार होणारे फ्री रेडिकल्स नष्ट होण्यास मदत होते आणि वृद्धत्व लांबविता येते, तसेच वय कमी दिसते.

प्रो. डॉ. जया विकास कुऱ्हेकरसदस्य, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया

तुम्ही मांसाहारी नाही? मग मांसाहाराइतकाच, किंबहुना अधिक गुणकारी आणि प्रथिनेयुक्त टोफू हा पर्याय उपलब्ध आहे, त्याचा नक्कीच लाभ घ्या!टोफू हा सोयाबीन्सच्या दुधातून बनविलेला पनीर आहे, जो कॅल्शियम आणि प्रथिने यांनी ओतप्रोत आहे. त्याला ‘बीन कर्ड’ असेही म्हणतात. त्याची स्वतःची अशी विशिष्ट चव असते, ज्यामुळे त्याचा वापर गोड आणि तिखट अशा दोन्ही पदार्थांमध्ये करता येतो. तो छिद्रमय असल्यामुळे त्याची शोषण शक्ती जास्त असते आणि म्हणूनच कोणत्याही पदार्थात वापरण्याआधी त्याला विविध प्रकारे मेरिनेट अर्थात मसाले किंवा दही लावून किंवा लिंबाचा रस लावून ठेवता येते, ज्यामुळे त्यात चव विकसित होते.

नेमके काेणते परिवर्तन घडवतो ?

मानवी शरीरामध्ये टोफू कॅल्शियम आणि प्रथिनांचे संतुलन राखतो. अगदी लहान खेळण्याच्या वयातील मुलांपासून ते गर्भवती महिला, जीममध्ये घाम गाळणाऱ्या व्यायामप्रिय व्यक्तींसाठीदेखील हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. टोफूमुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि ट्रायग्लिसराइडची शरीरातील मात्रा कमी होण्यास मदत होते. 

टोफूमधील अँटिऑक्सिडंटस्मुळे शरीरात तयार होणारे फ्री रेडिकल्स नष्ट होण्यास मदत होते आणि वृद्धत्व लांबविता येते, तसेच वय कमी दिसते. भरपूर प्रमाणात टोफूचे सेवन केल्यास ब्रेस्ट कॅन्सर, हृदयरोग आणि ऑस्टियोपरोसिस यासारख्या जीवघेण्या आजारांना प्रमाणात रोखता येते. टोफू मांसपेशींना आणि हाडे मजबूत करण्यात मदत करते. विशेष म्हणजे त्यात कॅलरीज कमी असतात; परंतु, लोह मात्र जास्त प्रमाणात असते.

शाकाहारी व्यक्तींसाठी वरदानच...शाकाहारी व्यक्तींसाठी टोफू हे एक वरदान आहे, असे म्हटल्यास अजिबात वावगे ठरणार नाही. त्यात मांसामध्ये आढळणारी सगळीच प्रथिने आहेत. नियमितपणे, तसेच आवश्यक त्या मात्रेत टोफूचे सेवन केल्यास मांसाहारी व्यक्तींपेक्षाही जास्त प्रथिनांचे प्रमाण पोटात जाते. मांसपेशींना जलद गतीने विकसित होण्यासाठी लागणारी अमिनो ॲसिड्स आणि आयसोफ्लेवोनिनस टोफूमध्ये अस्तित्वात असतात. टोफू प्रथिनांचा एक उत्तम स्रोत ठरला आहे. अर्धा कप टोफूमध्ये १० ग्रॅम प्रथिने मिळतात, ज्यातून ८८ कॅलरी ऊर्जा मिळते, तसेच झिंक, लोह, सेलेनियम, पोटॅशियम आणि काही विशिष्ट व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सदेखील टोफूमधून मिळतात.  अशा या बहुगुणी टोफूचा रोजच्या आहारात समावेश करण्यास काहीच हरकत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Tofu: A vegetarian boon for health, offering unique benefits.

Web Summary : Tofu, a protein-rich soybean curd, benefits all ages. It lowers cholesterol, fights free radicals, and may prevent diseases. A half-cup serving provides 10 grams of protein and essential minerals, making it a vegetarian superfood.
टॅग्स :Healthआरोग्य