वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये आयोजित 'व्हाइट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स असोसिएशन'च्या वार्षिक स्नेहभोजन समारंभात गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच 'सिक्रेट सर्व्हिस'ने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्यांना तातडीने हॉलबाहेर काढून सुरक्षित स्थळी नेले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
एका संशयित हल्लेखोराने हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील मॅग्नेटोमीटर (सुरक्षा तपासणी) क्षेत्राजवळ सुरक्षा कवच तोडण्याचा प्रयत्न केला. सिक्रेट सर्व्हिसने त्याला बॉलरूममध्ये प्रवेश करण्यापूर्वीच रोखले. मात्र, चिडलेल्या हल्लेखोराने तिथल्या एका सिक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळीबार केला. या घटनेनंतर संपूर्ण बँक्वेट हॉलमध्ये गोंधळ उडाला आणि पाहुण्यांनी जीव वाचवण्यासाठी टेबलांखाली आश्रय घेतला.
सिक्रेट सर्व्हिसने एका निवेदनात म्हटले आहे की, ते मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाच्या सहकार्याने या गोळीबाराचा तपास करत आहेत.
संशयिताची ओळख किंवा हेतू याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. काही वृत्तांमध्ये संशयिताला 'निष्प्रभ' करण्यात आल्याचे म्हटले आहे, परंतु ट्रम्प यांच्या पोस्टनुसार तो अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे.
नेमके काय घडले?
एएनआय रिपोर्टर रीना भारद्वाज व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरला उपस्थित होत्या. त्यांनी या दृश्याचे चित्रीकरण केले. त्यात त्या सांगतात, "काही मिनिटांपूर्वी, वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये गोंधळ उडाला. मला सर्वात आधी एक मोठा आवाज ऐकू आला. मला वाटले की भांडी पडण्याचा तो आवाज आहे.
"काही क्षणांतच, वेटर त्यांचे ट्रे घेऊन लपण्यासाठी सुरक्षित जागा शोधत आत पळताना दिसले. तेव्हा माझ्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. संपूर्ण टेबल टेबलांखाली लपले. आता उठणे सुरक्षित आहे असे मला वाटत असतानाच, मला स्टेजवर लांब बंदुका घेतलेले सुरक्षा रक्षक दिसले, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना बाहेर काढण्यात आले आहे. स्कॉट बेसेंट, काश पटेल, पीट हेगसेथ, विटकॉफ यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना एकेक करून बाहेर काढण्यात आले. कार्यक्रम लवकरच पुन्हा सुरू होईल असे जाहीर करण्यात आले आहे, परंतु आम्हाला अद्याप आयोजकांकडून काहीही कळवण्यात आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
Web Summary : Gunfire erupted near President Trump at a White House Correspondents' Association dinner in Washington. A suspect tried breaching security and fired at an agent before being apprehended. Trump and his cabinet were evacuated. Investigation underway.
Web Summary : वॉशिंगटन में व्हाइट हाउस संवाददाताओं के रात्रिभोज में राष्ट्रपति ट्रम्प के पास गोलीबारी हुई। एक संदिग्ध ने सुरक्षा तोड़ने की कोशिश की और पकड़े जाने से पहले एक एजेंट पर गोली चलाई। ट्रम्प और उनके मंत्रिमंडल को निकाला गया। जांच जारी है।