राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोजुबावी या ठिकाणी असलेल्या प्रतिमेसमोर 'अघोरी पूजा' सदृश प्रकार घडल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
अमोल मिटकरी यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री काही लोक अजितदादांच्या प्रतिमेला दिवा-बत्ती करण्यासाठी गोजुबावी येथे गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे पूजेच्या ताटात २ लिंबू आणि त्याला अनेक टाचण्या टोचलेल्या अत्यंत भयावह स्थितीत आढळली. हा प्रकार पाहून उपस्थितांचे धाबे दणाणले.
अघोरी पूजा की जाणीवपूर्वक कट?
मिटकरी यांनी या घटनेचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "हे कोणी जाणीवपूर्वक करतेय की अघोरी पूजा प्रकार?" सोबतच त्यांनी #भयावह असा हॅशटॅग वापरला आहे. अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत असा प्रकार घडल्याने हा त्यांना इजा पोहोचवण्याचा अघोरी प्रयत्न आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
परिसरात खळबळ, तपासाची मागणी
हा प्रकार अंधश्रद्धेतून केला आहे की राजकीय द्वेषातून, याचा तपास करण्याची मागणी आता समर्थकांकडून होत आहे. याआधीही अनेक नेत्यांच्या बाबतीत असे अघोरी प्रकार घडल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या, मात्र गोजुबावीतील या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Web Summary : Aghori puja-like act near Ajit Pawar's statue in Gojubavi caused a stir. Lemons pierced with pins were found, leading to speculation of a deliberate act to harm him.
Web Summary : गोजुबावी में अजित पवार की प्रतिमा के पास अघोरी पूजा जैसी हरकत से सनसनी। पिनों से छेदे हुए नींबू मिले, जिससे उन्हें नुकसान पहुंचाने की जानबूझकर की गई हरकत की अटकलें लगाई जा रही हैं।