शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 10:35 IST

1 / 7
सध्या सर्वांचीच कष्टाची कामे करण्याची सवय मोडली आहे. पूर्वी धुणी-भांडीच्या निमित्ताने शरीराच्या हालचाली होत होत्या. मात्र, आता काम करण्यासाठी मशिन्स किंवा घर काम करण्यासाठी महिला असल्याने शरीराची हालचाल करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
2 / 7
नोकरी व्यवसायामुळे आठ-दहा तास एकाच खुर्चीवर बसून काढावे लागत आहेत, असे सतत बसून राहणे धूम्रपानाइतकेच किंबहुना त्याहून अधिक धोकादायक आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे आणि शरीराच्या कमी हालचालीमुळे चयापचायची प्रक्रिया मंदावते आणि त्यातून गंभीर आजार उद्भवतात.  
3 / 7
तासनतास बसून राहिल्याने रक्ताभिसरण मंदावते आणि चरबी साठून राहते. त्यामुळे हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. धूम्रपानामुळे आरोग्यावर जे परिणाम होतात, तेच परिणाम तासनतास बसल्याने होतात. 
4 / 7
एकाच जागी खूप वेळ बसल्याने लठ्ठपणा येतो. हालचाल कमी झाल्याने कॅलरीज बर्न होत नाहीत. परिणामी, वेगाने वजन वाढते. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने किंवा जास्त वेळ बसल्याने पाठीच्या मणक्यावर ताण पडतो.
5 / 7
तीव्र कंबरदुखी, पाठदुखी आणि मानदुखी होऊ शकते. सध्या वर्क लोडच्या नावाखाली कार्यालयात तासनतास बसावे लागते. आधीच कामाचा ताण आणि त्यात आठ-दहा तासांहून अधिक काळ बसल्याने आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
6 / 7
कशी घ्याल काळजी? - कामामधून ब्रेक घ्या : दर ३० ते ६० मिनिटांनी  खुर्चीवरून उठा आणि पाच मिनिटे चाला. उभे राहून काम करा : शक्य असल्यास स्टँडिंग डेस्क वापरा.
7 / 7
व्यायाम करा : दिवसातून किमान ४५ मिनिटे चाला, हलकी योगासने करा. पोश्चर सुधारा : बसताना पाठ सरळ ठेवा आणि मॉनिटर डोळ्यांच्या पातळीवर ठेवा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स