नाशिक: भोंदू अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात शुक्रवारी (दि.२४) न्यायालयाने रविवारपर्यंत (दि. २६) पोलीस कोठडी सुनावली आहे. भोंदू खरातला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
पीडितेवर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा भोंदू खरातने घेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिला माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार आहे. अत्याचाराबाबत वाच्यता करशील तर तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं नुकसान होईल, अशी भीती घातली, अशी माहिती न्यायालयात सरकारी अभियंता किरण बेंडभर, दर्शन इंगळे यांनी दिली तसेच खरातला या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी देऊ नये, अशी विनंती न्यायालयाला केली.
आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
झोप गेली, डोकंही दुखतंय... आलिशान जीवन जगणाऱ्या भोंदू अशोक खरातचं प्रकृतीविषयी रडगाणं
खरातच्या वकिलांनी मात्र मागील गुन्ह्याचा कलम सारखाच असल्याने अजून कुठला तपास बाकी आहे, सरकारी वकील तेच ते मुद्दे मांडून पोलीस कोठडी मागत असल्याचे नमूद केले. न्यायालयाने खरातला २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय
भोंदू खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर, भक्तांची यादी ईडीच्या ताब्यात
ओकस प्रापर्टी येथील कार्यालयात पीडित महिला आल्यावर तिला तुझे कल्याण होईल, पण यासाठी माझे ऐकावे लागेल यासाठी पीडितेला वेगवेगळ्या प्रकारची भीती दाखविली. त्यामुळे संपूर्ण गुन्ह्याचा तपास बाकी असल्याने पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली.
Web Summary : Ashok Kharat, accused of exploiting a woman by falsely claiming divine powers, had his police custody extended until Sunday. He threatened her and her family if she revealed the abuse. The court heard arguments from both sides before granting the extension for further investigation into the case.
Web Summary : आशोक खरात, एक महिला का दैवीय शक्ति का झूठा दावा कर शोषण करने के आरोपी, की पुलिस हिरासत रविवार तक बढ़ा दी गई। उसने दुर्व्यवहार का खुलासा करने पर उसे और उसके परिवार को धमकी दी। अदालत ने आगे की जांच के लिए विस्तार देने से पहले दोनों पक्षों की दलीलें सुनीं।