Join us
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:38 IST

Gold Silver Rate Today: जागतिक बाजारपेठेतील उलथापालथीचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वाढीसह बंद झाले

Gold Silver Rate Today: जागतिक बाजारपेठेतील उलथापालथीचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वाढीसह बंद झाल्यानंतर, आज म्हणजेच २५ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बाजारातही (Comex) किमतींमध्ये किंचित सुधारणा झाली. मात्र, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार सावध झाले असून, किमतींमध्ये स्थिरतेऐवजी अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालंय.

आजचे ताजे दर

मागील सत्रात MCX वर मे डिलिव्हरीसाठीची चांदी १.३८% च्या वाढीसह २,४४,८४५ रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्याचवेळी, सोन्याच्या दरात ०.७०% ची तेजी दिसून आली आणि ते १,५२,८३० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. आज कोमेक्सवर (Comex) सोनं ०.०३% च्या वाढीसह ४,७२५.४० डॉलर आणि चांदी ०.२४% च्या तेजीसह ७५.६८५ डॉलर प्रति औन्सवर व्यवहार करत आहे.

आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका

किमतींवरील दबावाची मुख्य कारणं

सोन्या-चांदीच्या किमतींबाबत सध्या 'वेट अँड वॉच' अशी स्थिती आहे. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिका आणि इराणमधील धुमसणारा तणाव. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधील वाढत्या हालचालींमुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता वाढली आहे. अशा परिस्थितीत डॉलर इंडेक्स मजबूत होत आहे, जे सहसा सोन्याच्या किमतींसाठी नकारात्मक मानलं जातं.

बाजार तज्ज्ञांचे मत आणि भविष्यातील कल

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, पश्चिम आशियातील तणावामुळे बाजार बचावात्मक मोडमध्ये आला आहे. सोनं सध्या आपल्या दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळ आहे. तांत्रिकदृष्ट्या, जोपर्यंत भू-राजकीय परिस्थिती स्पष्ट होत नाही, तोपर्यंत बुलियन मार्केटमध्ये नफावसुली आणि दबाव पाहायला मिळू शकतो. फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मध्य-पूर्व संकटामुळे दीर्घकालीन तेजीला सध्या ब्रेक लागला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Global instability impacts gold-silver rates; investors cautious amid Iran-US tensions.

Web Summary : Global market volatility impacts Indian bullion market. Rising Iran-US tensions create uncertainty, pushing investors to 'wait and watch.' Gold, silver see slight gains amid volatile conditions. Analysts foresee potential profit-taking due to geopolitical risks.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकपैसा