शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 11:33 IST

US Iran conflict 2026 update : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चेसाठी आपल्या दूतांचा पाकिस्तान दौरा रद्द केला आहे.

राण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जारेड कुशनर यांचा पाकिस्तान दौरा शेवटच्या क्षणी रद्द केला आहे. "इराणमध्ये नेमके निर्णय कोण घेत आहे हेच स्पष्ट नाही, अशा स्थितीत १८ तासांचा प्रवास करून वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही," अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ट्रम्प यांची 'वेट अँड वॉच' भूमिकाट्रम्प यांनी स्पष्ट केले की, दौरा रद्द करण्याचा अर्थ पुन्हा युद्ध सुरू करणे असा होत नाही. मात्र, सध्या अमेरिका अत्यंत मजबूत स्थितीत असून "सगळे पत्ते आमच्या हातात आहेत," असा दावा त्यांनी केला. जर इराणला खरोखरच शांतता हवी असेल, तर त्यांनी स्वतः अमेरिकेशी संपर्क साधावा, असेही ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले.

इराणची 'जबरदस्तीने चर्चा नाही' अशी अटदुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. "आम्ही दबाव आणि धमक्यांच्या सावलीत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा करणार नाही," असे त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवर बोलताना स्पष्ट केले. सागरी नाकेबंदी उठवणे ही चर्चेसाठीची प्रमुख अट असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांचा पाकिस्तान दौरा..अमेरिकन अधिकारी पोहोचण्यापूर्वीच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची पाकिस्तानचा दौरा आटोपून रवाना झाले. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांची भेट घेऊन अमेरिकेच्या मागण्यांवर आपल्या हरकती आणि इराणच्या अटी सादर केल्या. इराणचे परराष्ट्र मंत्री निघून गेल्याने अखेर अमेरिकेने पाकिस्तानला न जाणेच पसंत केले आहे. 

गेल्या २४ तासांतील ५ महत्त्वाच्या घडामोडी:

  • जर्मनीची एन्ट्री: हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवण्यासाठी जर्मनी आता आंतरराष्ट्रीय मोहिमेत सामील होणार आहे.

  • इस्रायलकडून ड्रोनचा मारा: वेस्टर्न गलीली भागात इस्रायलने हिजबुल्लाचा संशयास्पद ड्रोन पाडला, जो शस्त्रसंधीचे उल्लंघन मानले जात आहे.

  • 'फातिमाची गोष्ट': इराणने २८ फेब्रुवारीच्या शाळा हल्ल्यात बळी पडलेल्या विद्यार्थिनीचा AI व्हिडिओ जारी करून जगाचे लक्ष वेधले आहे.

  • हज प्रवासाला सुरुवात: युद्धानंतर इराणमधील हज प्रवाशांचा पहिला जत्था सौदी अरेबियात पोहोचला असून, हे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचे संकेत मानले जात आहेत.

  • पाकिस्तानची शिष्टाई: इराणने अराघची यांचा पाकिस्तान दौरा अत्यंत 'उपयुक्त' असल्याचे वर्णन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's mediation fails as US cancels visit amid Iran tensions.

Web Summary : US cancels Pakistan visit amid Iran tensions, deeming talks unproductive. Iran insists no negotiations under pressure, setting conditions. Despite this, Iran considers Pakistan visit 'useful'. Meanwhile, Germany joins Hormuz Strait mission.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरPakistanपाकिस्तानIranइराणWarयुद्धAmericaअमेरिका