दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर शनिवारी रात्री उशिरा एक अपघात घडला. दिल्लीहून झुरिचसाठी उड्डाण करणार असलेल्या स्विस एअरच्या LX147 या विमानाच्या पहिल्या इंजिनमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला, यावेळी त्या विमानाला आग लागली. विमान अंदाजे १०४ नॉट्सच्या वेगाने प्रवास करत होते.
वैमानिकाने तात्काळ उड्डाण रद्द केले आणि विमान धावपट्टीवर थांबवले. सर्व २३२ प्रवाशांना आपत्कालीन स्लाईड्सच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.
आगीत सहा प्रवासी भाजले
इमर्जन्सी स्लाईडवरून खाली उतरत असताना सहा प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रनवे २८ सध्यापुरता बंद करण्यात आला असून, स्विस एअरने प्रवाशांसाठी हॉटेल आणि इतर विमान प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी एक विशेष पथक तैनात केले आहे.
Web Summary : A Swiss Air flight aborted takeoff in Delhi due to an engine fire. All 232 passengers evacuated via emergency slides; six sustained injuries. The runway is temporarily closed. The airline is arranging accommodation and alternative travel for passengers.
Web Summary : दिल्ली में स्विस एयर की उड़ान इंजन में आग लगने के कारण उड़ान भरने से चूक गई। सभी 232 यात्रियों को आपातकालीन स्लाइड के माध्यम से निकाला गया; छह घायल। रनवे अस्थायी रूप से बंद है। एयरलाइन यात्रियों के लिए आवास और वैकल्पिक यात्रा की व्यवस्था कर रही है।