आयपीएल २०२६ चा अर्धा अधिक हंगाम आटोपत आला तरी चेन्नईचा माजी कर्णधार आणि सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्र सिंग धोनी अद्याप एकही सामन्यात मैदानावर उतरलेला नाही. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे तो खेळला नव्हता. मात्र मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीतून धोनी कमबॅक करेल असे सांगण्यात येत होते. मात्र धोनी त्या सामन्यात खेळला नव्हता. आता धोनी स्वत:च संघाबाहेर राहिला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यामागचं कारणही समोर आलं आहे.
आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपरकिंग्सची गाठ गुजरात टायटन्सशी पडणार आहे. मात्र धोनी या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, मिळत असलेल्या माहितीनुसार महेंद्रसिंग धोनी आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. मात्र तो संघातील पुनरागमनास जाणीवपूर्वक उशीर करत आहे. आपल्याला संघात घेण्यासाठी टीम कॉम्बिनेशनमध्ये बदल करण्यात येऊ नये, असे त्याने संघव्यवस्थापनाला सांगितले आहे.
तसेच चेन्नईचं संघव्यवस्थापनही धोनीला मैदानात उतरवण्यासाठी कुठल्याही घाई गडबडीत नाही आहे. सध्या संजू सॅमसन चेन्नईकडून यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत आहे. तसेच धोनीही कुठल्याही युवा खेळाडूला संघाबाहेर करून संघा येण्यास इच्छूक नाही आहे. त्यामुळे आता आज होणाऱ्या गुजराविरुद्धच्या सामन्यातही तो खेळण्याची शक्यता कमीच आहे.
Web Summary : Despite fitness, Dhoni delays his CSK return, prioritizing team balance. He doesn't want changes to accommodate him, allowing Samson to perform well. His return against Gujarat is unlikely.
Web Summary : फिट होने के बावजूद, धोनी टीम संतुलन को प्राथमिकता देते हुए, सीएसके में अपनी वापसी में देरी कर रहे हैं। वह नहीं चाहते कि उनके लिए बदलाव हों, जिससे सैमसन अच्छा प्रदर्शन कर सकें। गुजरात के खिलाफ वापसी की संभावना कम।