पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातील कामगिरी कमालीची निराशाजनक झाली आहे. मुंबईला आतापर्यंत खेळलेल्या ७ पैकी ५ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. यादरम्यान, दुखापतग्रस्त झालेला माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याची उणीव मुंबईला प्रकर्षाने जाणवत आहे. एकापाठोपाठ होत असलेले पराभव आणि प्रमुख फलंदाजांचा हरवलेला फॉर्म यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्ससाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा हा पुढच्या सामन्यातून संघात पुनरागमनक करण्याची शक्यता आहे. या संदर्भात समोर येत असलेल्या वृत्तांनुसार रोहित शर्मा हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमधून सावरत असून, तो २९ एप्रिल रोजी होणाऱ्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यका आहे.
रोहित शर्मा हा १२ एप्रिल रोजी आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो सलग तीन सामन्यांना मुकला होता. तसेच रोहित शर्माच्या अनुपस्थितीचा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीवर स्पष्टपणे परिणाम दिसून आला होता. यादरम्यान मुंबईने दानिश मालिवाल याला सलामीला पाठवण्याचा प्रयोग करून पाहिला. मात्र त्याला केवळ २ धावाचा काढता आल्या.
दरम्यान, रोहित शर्माने या हंगामाची सुरुवात बऱ्यापैकी केली होती. त्याने चार सामन्यात १६५ चा स्ट्राईक रेट आणि ४५ च्या सरासरीने १३७ धावा काढल्या होत्या. मात्र रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि इतर अनुभवी खेळाडू म्हणावी तशी चमक दाखवू शकले नाहीत.
Web Summary : Mumbai Indians, struggling in IPL, may receive a boost. Injured Rohit Sharma is likely to return for the Sunrisers Hyderabad match on April 29 after recovering from a hamstring injury. His absence has impacted Mumbai's batting lineup.
Web Summary : आईपीएल में संघर्ष कर रही मुंबई इंडियंस को राहत मिल सकती है। चोटिल रोहित शर्मा 29 अप्रैल को सनराइजर्स हैदराबाद के खिलाफ हैमस्ट्रिंग की चोट से उबरने के बाद वापसी कर सकते हैं। उनकी अनुपस्थिति ने मुंबई की बल्लेबाजी लाइनअप को प्रभावित किया है।