PM Modi Reaction Over White House Firing: व्हाइट हाऊसच्या एका कार्यक्रमात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच हल्लेखोराने गोळीबार केला. परंतु, चाणाक्ष सुरक्षा रक्षकांना तत्काळ हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि पुढील मोठा अनर्थ टळला. व्हाइट हाऊस कॉरेस्पॉडेंट्स डिनर कार्यक्रमात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच गोळीबाराची घटना घडल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. या गोळीबार प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.
अशा भ्याड कृत्यांमुळे मी माझ्या ध्येयापासून परावृत्त होणार नाही. ही घटना मला इराणविरुद्ध सुरू असलेले युद्ध जिंकण्यापासून रोखू शकणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केले. तसेच ट्रम्प यांनी वॉशिंग्टन हिल्टनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भविष्यात 'ड्रोन-प्रूफ' आणि 'बुलेटप्रूफ' काचेने सुसज्ज अशी एक आधुनिक 'वॉर रूम' बांधण्याच्या गरजेवर भर दिला. सिक्रेट सर्व्हिसने मला, मेलानिया आणि व्हान्स यांच्यासह इतरांना ज्या वेगाने बाहेर काढले, ते कौतुकास्पद आहे. अटक करण्यात आलेला हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा असून तो आजारी आहे. माझे सर्व मंत्रिमंडळ सहकारी सुरक्षित आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.
लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतात की, वॉशिंग्टन डी.सी. येथील एका हॉटेलमध्ये नुकत्याच घडलेल्या सुरक्षाविषयक घटनेनंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, प्रथम महिला आणि उपराष्ट्राध्यक्ष हे सुखरूप व सुरक्षित असल्याचे समजून मला दिलासा मिळाला आहे. त्यांच्या निरंतर सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही आणि अशा हिंसाचाराचा निःसंदिग्धपणे निषेधच केला गेला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तातडीने राष्ट्रपती ट्रम्प यांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढले. या कार्यक्रमात २६०० लोक जमले होते.
Web Summary : PM Modi expressed relief after a shooting near the White House, ensuring President Trump's safety. He condemned violence in democracies and wished for the continued well-being of Trump and his team following the incident at Washington D.C.
Web Summary : व्हाइट हाउस के पास गोलीबारी के बाद पीएम मोदी ने राहत व्यक्त की, राष्ट्रपति ट्रम्प की सुरक्षा सुनिश्चित की। उन्होंने लोकतंत्र में हिंसा की निंदा की और वाशिंगटन डी.सी. की घटना के बाद ट्रम्प और उनकी टीम के निरंतर कल्याण की कामना की।