शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 11:36 IST

1 / 9
नाशिक: अशोक खरातच्या फार्म हाऊसमधील अश्लील व इतर काही संशयास्पद व्हिडीओ एसआयटीच्या हाती लागले असून, खरातविरुद्ध फिर्याद दाखल करणारा ललित पोफळे याने आपल्या मर्जीतील एका तरुणास खरातकडे अनेक महिने कुक म्हणून नोकरीस ठेवून खरातच्या काळ्या कृत्याचा भंडाफोड केल्याचे तपासात उघड झाले आहे.
2 / 9
खरातचे काळे कारनामे बाहेर काढण्यामागे त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधवनंतर या कुकचीदेखील भूमिका महत्त्वाची राहिली आहे. संबंधित कुकची ड्यूटी फार्म हाऊसवर होती.
3 / 9
या फार्म हाऊसवर खरात काही महिलांना घेऊन येत असे. तेव्हा तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यासाठी खरात तेथील कुकला सूचना करी. परंतु, खरातच्या काळ्या कृत्याचा शोध घेणारा हा कुक कॅमेरे बंद करीत नसे.
4 / 9
खरातचा एकेकाळचा विश्वासू ललित पोफळे याने जी फिर्याद खरातच्या विरोधात दाखल केली त्यात कुकबाबतचा धक्कादायक खुलासा केला असून, खरातला जेव्हा एका कुकची फार्महाऊवर गरज होती तेव्हा ही पोफळे पहिला विश्वासू, नंतर विरोधात भोंदू खरातचा विश्वासू सहकारी म्हणून ललित पोफळेची ओळख होती.
5 / 9
मात्र, पोफळे यालाच खरातने तब्बल साडेआठ कोटींत गंडविले. या दोघांत नंतर खटके उडाले. त्यातच पोफळे याचा खरातबाबतच्या दैवी चमत्काराबद्दलचा विश्वास उडाला.
6 / 9
त्यात खरातचे काही गैरकृत्यदेखील कळाले. या सर्व प्रकारामुळे पोफळे याने खरातच्या कृत्याचा भंडाफोड करण्याचा निर्णय घेत फार्महाऊसवर आपल्या मर्जीतील कुक ठेवला.
7 / 9
चालकाने पोफळे याच्या कानावर ही बाब सांगताच पोफळे याने मर्जीतील कुक खरातच्या फार्महाऊसर ठेवला तसेच या कुकचा पगार मीच अदा करेल, असे खरातला सांगितले. तेव्हा कुकच्या माध्यमातून खरातच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले.
8 / 9
खरात जेव्हा थकत असे, तेव्हा फार्महाऊसवर दोन दोन रात्र राहत असे. खरात काही महिलांसोबत आतमध्ये दारू पीत असे, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करीत असे, हे सर्व तेथील सीसीटीव्हीत कैद झाले आहे, असे पोफळे याने फिर्यादीत म्हटले आहे.
9 / 9
कुकबद्दल खरातला संशय आला असता पोफळे याचा चालक दिनेश मंडलला खरातने निरोप देऊन कुकला कामावरून काढून टाकले जाईल, अशी ताकीद दिली होती. खरातचे अश्लील चाळेच नव्हे तर खरात मंदिरात व बाहेर हातचलाखी करून फसवितो आदी बाबी या कुकने टिपल्या होत्या.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी