दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर' दरम्यान शनिवारी रात्री ८:४० च्या सुमारास गोळीबाराचा आवाज ऐकू आला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे मंचावर असतानाच मुख्य सुरक्षा तपासणी क्षेत्राजवळ एका संशयिताने गोळीबार केला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये मोठी घबराट पसरली.
जेव्हा मुख्य बॉलरुममध्ये भोजन सुरू होते, तेव्हा संशयिताने सुरक्षा तपासणी केंद्राजवळ किमान एक गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज येताच सीक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना वेढले आणि मंचावरून सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांनी कोल टॉमस ॲलन (३१) या कॅलिफोर्नियातील संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे शॉटगन, हँडगन आणि अनेक चाकू सापडले आहेत.
४५ वर्षांपूर्वीचा 'तो' काळा दिवस या घटनेने ३० मार्च १९८१ च्या त्या घटनेच्या आठवणी जाग्या केल्या, जेव्हा याच हॉटेलच्या बाहेर जॉन हिंकले ज्युनियर याने राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्या हल्ल्यात रेगन यांच्या फुफ्फुसाला गोळी लागली होती, मात्र शस्त्रक्रियेनंतर ते बचावले. रेगन यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्याला 'प्रेसिडेंट्स वॉक' म्हटले जाते. शनिवारची घटनाही याच भागाच्या जवळ घडली.
ट्रम्प आणि मोदींची प्रतिक्रियाट्रम्प: "सीक्रेट सर्व्हिस आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी उत्तम काम केले," असे म्हणत ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केली.
पंतप्रधान मोदी: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल समाधान व्यक्त केले.
Web Summary : Gunfire erupted near Trump at White House Correspondents' Dinner; suspect arrested. The incident evoked memories of the 1981 Reagan assassination attempt at the same hotel. Prime Minister Modi condemned the attack.
Web Summary : व्हाइट हाउस कॉरेस्पोंडेंट्स डिनर में ट्रम्प के पास गोलीबारी; संदिग्ध गिरफ्तार। घटना ने उसी होटल में 1981 में रेगन पर हुए हमले की यादें ताजा कर दीं। प्रधानमंत्री मोदी ने हमले की निंदा की।