तेलंगाणामधील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील अलेर रेल्वे स्टेशनजवळ चारमीनार एक्स्प्रेसला आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार ही आग ट्रेनच्या एस५ या डब्यात लागली. अचानक आगीचे लोळ उठत असल्याचे दिसून आल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. तसेच काही प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेन अलेर स्टेशनजवळ पोहोचली असताना प्रवाशांना डब्यामध्ये धूर पसरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गडबड आणि गोंधळ उडाला. प्रवासी डब्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान, कुणीतरी आणीबाणीच्या परिस्थितीत वापरली जाणारी साखळी ओढल्याने ट्रेन थांबली. त्यामुळे प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर पडण्याची संधी मिळाली. प्राथमिक माहितीनुसार या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेबाबत रेल्वेकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, या आगीच्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ही आग शॉर्ट सर्किट किंवा अन्य कुठल्या तरी तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मात्र त्याबाबतची माहिती तपासानंतरच पुढे येऊ शकते.
दरम्यान, ट्रेनमध्ये आग लागल्याच्या घटनेचे अनेक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहेत. त्यात डब्यामधून धूर आणि आग बाहेर येताना दिसत आहे. तर याबाबत एका प्रवाशाने सांगितले की, ट्रेनमध्ये अचानक आग लागली. या आगीमुळे संपूर्ण डबा धुराने भरला. घाबरलेल्या प्रवाशांनी खबरदारीचा उपाय म्हणून साखळी ओढली आणि ट्रेन थांबवली. मात्र ट्रेन थांबण्यापूर्वीच काही प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या.
Web Summary : Charminar Express caught fire near Aler station, Telangana. Passengers panicked and jumped from the moving train. No casualties reported. The cause is suspected to be a short circuit. Investigation underway.
Web Summary : तेलंगाना के अलेर स्टेशन के पास चारमीनार एक्सप्रेस में आग लग गई। यात्री घबरा गए और चलती ट्रेन से कूद गए। कोई हताहत नहीं। शॉर्ट सर्किट का संदेह। जांच जारी है।