शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 05:00 IST

विधानसभेसाठी रणनीती! चड्ढांची भूमिका ठरेल निर्णायक, भगवंत मान सरकारला धोका 

नवी दिल्ली - राघव चड्ढा यांच्यासह सात राज्यसभा खासदारांनी एकाचवेळी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजप पंजाबमध्ये मोठा ‘खेळ’ करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन लोटस’च्या दुसऱ्या टप्प्यात या खासदारांच्या जवळच्या ३५ ते ४० आमदारांना आपल्या गोटात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत स्पष्ट बोलण्याचे टाळत असले तरी त्यांनी या घडामोडींबाबत स्पष्ट शब्दांत इन्कारही केलेला नाही.

पंजाबमध्ये २०२७ साली विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने  ही घडामोड पंजाबमधील ‘आप’साठी सर्वांत मोठे संकट मानले जात आहे. यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल हे पंजाबमध्ये पक्षाच्या रणनीती व संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावत होते. पण, आता त्या गोष्टींचा फायदा भाजपला होणार आहे.

मान राष्ट्रपतींना भेटणारमुख्यमंत्री भगवंत मान यांनी पक्षाच्या आमदारांसह राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. या भेटीत ते बंडखोर खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका मांडणार आहेत. आप नेते संजय सिंह यांनी सांगितले की, त्या सात खासदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी राज्यसभा सभापतींना पत्र लिहून करणार आहे.

चड्ढांचे फॉलोअर्स १४ लाखांनी घटले ‘आप’चा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स सुमारे १४ लाखांनी घटले आहेत. शुक्रवारी त्यांचे १.४६ कोटी फॉलोअर होते, तर शनिवारी संध्याकाळपर्यंत ही संख्या १.३२ कोटीपर्यंत खाली घसरली. तरुण युजर्सनी एकप्रकारे ही नाराजी दर्शविली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चड्ढा हे तरुणांमध्ये  लोकप्रिय आहेत. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे युवा समर्थकांना रुचले नसल्याची चर्चा आहे. 

‘आप’मध्ये आणखी फूट पडणार?२०२२मध्ये पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयामागे संदीप पाठक आणि राघव चड्ढा यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे या नेत्यांच्या भाजपमध्ये जाण्याचा ‘आप’ची संघटना आणि निवडणुकीच्या व्यवस्थापनावर परिणाम होणे निश्चित मानले जात आहे. ही फूट म्हणजे पक्षातील वाढत्या असंतोषाचा परिणाम आहे, असे मत राजकीय निरीक्षकांचे आहे. ‘आप’चे खासदार आपल्या गोटात आणून भाजपने पंजाबमध्ये २०२७च्या विधानसभा निवडणुकांसाठी ‘एकला चलो’ धोरणावर काम सुरू केले आहे.

केजरीवालांनी ‘शीशमहल-२’ सज्ज केल्याचा भाजपचा आरोप; आपचा इन्कारआम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील लोधी इस्टेट येथे मिळालेल्या नव्या बंगल्याच्या मुद्द्यावरून भाजपने त्यांना लक्ष्य केले. हा बंगला म्हणजे ‘शीशमहल-२’ असून, त्यात अनेक सुविधांसाठी खासगी निधीचा मोठा वापर केल्याचा आरोप दिल्लीचे सार्वजनिक बांधकाममंत्री प्रवेशसाहिब सिंग वर्मा यांनी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. हा आरोप व त्याच्या पुष्ट्यर्थ भाजपने प्रसिद्ध केलेले फोटो खोटे असल्याचा दावा आप नेत्या आतिशी यांनी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Eyes 'Operation Lotus' in Punjab, Targeting AAP MLAs

Web Summary : Following defections, BJP allegedly plans to sway 35-40 AAP MLAs in Punjab, potentially destabilizing Bhagwant Mann's government. AAP alleges BJP's false claims about Kejriwal's residence.
टॅग्स :AAPआपBJPभाजपाRaghav Chadhaराघव चड्ढाArvind Kejriwalअरविंद केजरीवालBhagwant Mannभगवंत मान