शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 09:00 IST

या मोहिमेसाठी अमेरिकेने आपली दोन आधुनिक 'लिमिटोरल कॉम्बॅट शिप्स' तैनात केली असून, जपानमधूनही विशेष 'माइनस्वीपर' जहाजे मध्यपूर्वेकडे रवाना झाली आहेत.

वॉशिंग्टन / दुबई : जागतिक अर्थव्यवस्थेला असलेला धोका लक्षात घेऊन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने पेरलेले पाणसुरुंग हटविण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी नौदलाला सुरुंग शोधण्याची मोहीम तिप्पट वेगाने राबवण्याचे सांगतानाच, सुरुंग पेरणाऱ्या कोणत्याही बोटीवर थेट हल्ला करण्याचे आदेशही दिले आहेत. 

पेंटागॉननुसार, हे सुरुंग पूर्णपणे साफ करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. फॉरेन पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अभ्यासक एम्मा सॅलिस्बरी यांच्या मते, इराणने केवळ सुरुंग पेरल्याची अफवा पसरवली तरी  जहाजांचा या मार्गावरील विश्वास उडू शकतो. हे सुरुंग जुन्या सोव्हिएत बनावटीचे किंवा आधुनिक चिनी बनावटीचे असल्याची शक्यता आहे. 

पाणसुरुंग शोधक जहाजे रवानाया मोहिमेसाठी अमेरिकेने आपली दोन आधुनिक 'लिमिटोरल कॉम्बॅट शिप्स' तैनात केली असून, जपानमधूनही विशेष 'माइनस्वीपर' जहाजे मध्यपूर्वेकडे रवाना झाली आहेत. मोठ्या जहाजांऐवजी नौदलाचे विशेष पाणबुडे आणि स्फोटक तज्ज्ञ शत्रूच्या नजरेत येऊ नये म्हणून छोट्या गटांमध्ये काम करत आहेत. याशिवाय हेलिकॉप्टरद्वारे लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याखालील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

विमा कंपन्या चिंताग्रस्त होर्मुझचा मार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटत नाही, तोपर्यंत विमा कंपन्या जहाजांना या मार्गावरून जाण्यास संमती देण्यास कचरत आहेत.सध्याच्या परिस्थितीत जहाजांना इराणच्या संमतीने त्यांच्या किनारपट्टीच्या जवळून प्रवास करावा लागत आहे. अमेरिकेच्या या ‘माइन हंटिंग’वरच आता तेलकिमतीचे भवितव्य अवलंबून आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US Orders Mine Hunt in Hormuz Strait Amidst Iran Tensions

Web Summary : Trump orders naval mine removal from Hormuz Strait due to Iranian threats. The US Navy is deploying ships and technology to clear mines, a move crucial for global oil stability as insurance firms hesitate, impacting oil prices.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प