CM Devendra Fadnavis PC News: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूर येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. विरोधक, इतिहासकार धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या विधानावरून टीका करत आहेत. अशातच माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबाबत सुरू असलेल्या वादात नव्याने भर पडल्याचे सांगितले जात आहे. भूषण गवई आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भेटीवरून श्याम मानव यांनी केलेल्या विधानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.
सरन्यायाधीशासारखे सर्वोच्च पद भूषवूनही भूषण गवई हे धीरेंद्र शास्त्री यांच्यापुढे नतमस्तक होत असतील, तर आता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगू नये. भूषण गवई सांगतात की ते आंबेडकरी विचारांचे आहेत. पण जर ते धीरेंद्र शास्त्री यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतील, तर त्यांनी आंबेडकरांचे नाव कधीही घेऊ नये. तो अधिकार त्यांनी गमावला आहे, अशी टीका श्याम मानव यांनी केली होती. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
श्याम मानव कोण? त्यांना अधिकार काय?
भूषण गवईंनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊ नये, असं श्याम मानव म्हणाले होते, याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, हे असे सांगणारे श्याम मानव कोण आहेत, त्यांना कोणी अधिकार दिला, ते आता सर्टिफिकेट वाटणार का, श्याम मानव अलीकडच्या काळात फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. त्यांना कुणी विचारत नाही. त्यांना प्रसिद्धी हवी आहे, म्हणून ते रोज अशी विधाने करतात, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले.
दरम्यान, अलीकडेच माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, नवा वाद निर्माण झाला आहे. या भेटीवरून भूषण गवई यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. माजी सरन्यायाधीश गवई, आणि तेही एका द्वेष ओकणाऱ्या लबाडासोबत! ते न्यायव्यवस्थेला नेमका कोणता संदेश देत आहेत! हे अत्यंत धक्कादायक आहे!, असे प्रशांत भूषण यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.
Web Summary : CM Fadnavis criticized Shyam Manav for questioning Bhushan Gavai's meeting with Dhirendra Shastri. He questioned Manav's authority to issue certificates and accused him of seeking publicity.
Web Summary : सीएम फडणवीस ने भूषण गवई की धीरेंद्र शास्त्री से मुलाकात पर श्याम मानव की टिप्पणी की आलोचना की। उन्होंने मानव के अधिकार पर सवाल उठाया और उन पर प्रचार पाने का आरोप लगाया।