सनरायझर्स हैदराबादचा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. काल राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या लढतीत आक्रमक अर्धशतकी खेळी करत हैदराबादच्या विजयाची पायाभरणी केली होती. त्यासोबतच त्याने सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावत ऑरेंज कॅपवर कब्जा केला होता. दमदार फलंदाजीमुळे अभिषेक शर्माचा चाहता वर्गही कमालीचा वाढला आहे. यादरम्यान, अभिषेक शर्माच्या या चाहत्या वर्गाचा प्रत्यय येणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अभिषेक शर्माला पाहिल्यानंतर उत्साहित झालेली एक तरुणी चक्क त्याचा हात पकडताना दिसत आहे.
अभिषेक शर्मा तिथून जात असताना सदर तरुणी त्याच्या दिशेने धावली आणि तिने अभिषेकचा हात पकडून त्याला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अभिषेक शर्माही काही क्षण अवाक् झाला. तो काहीसा घाबरलेला आणि गोंधळलेला दिसला. मात्र तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या तरुणीला बाजूला करून अभिषेक शर्माला वाट मोकळी करून दिली.
दरम्यान, अभिषेक शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, काल राजस्थानविरु्द्धच्या लढतीत राजस्थानने दिलेल्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेकने हैदराबादला जोरदार सुरुवात करून दिली होती. अभिषेकने २ चेंडूत ५७ धावा कुटून काढल्या होत्या. तसेच ईशान किशनसोबत १३२ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली होती. तर त्याआधीच्या लढतीत अभिषेकने १३५ धावांची शतकी खेळी केली होती.
Web Summary : Abhishek Sharma, in superb form, had a fan grab his hand. The startled cricketer was quickly protected by security after the incident.
Web Summary : अभिषेक शर्मा, शानदार फॉर्म में, एक प्रशंसक ने उनका हाथ पकड़ लिया। इस घटना के बाद हैरान क्रिकेटर को सुरक्षाकर्मियों ने तुरंत बचाया।