Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?

वैभव सूर्यवंशीच्या दुखापतीसंदर्भात काय म्हणाले RR संघाचे कोच? 

By सुशांत जाधव | Updated: April 26, 2026 16:47 IST

Open in App

IPL 2026 Vaibhav Suryavanshi Injury : राजस्थान रॉयल्स संघातील वंडर बॉय वैभव सूर्यवंशी याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात IPL इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जलद सेंच्युरी झळकावली. ३६ चेंडूत शतक साजरे करणाऱ्या १५ वर्षीय सलामीवीराने ३७ चेंडूत १०३ धावांची धमाकेदार खेळी केली. या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान वैभव सूर्यवशी याने स्नायू दुखापतीमुळे लंगडत लंगडत मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे तो पुढच्या सामन्याला मुकणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी प्रशिक्षकाने त्याला नेमकं काय झालं त्यासंदर्भात माहिती दिली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!वैभव सूर्यवंशीच्या दुखापतीसंदर्भात काय म्हणाले RR संघाचे कोच? 

वैभव सूर्यवंशीच्या दुखापतीसंदर्भात राजस्थान रॉयल्सचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड म्हणाले की, सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्नायू दुखापतीची समस्या उद्भवली. त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले असून सध्याच्या घडीला तो ठीक आहे. दुखापत गंभीर नाही." असे सांगत त्यांनी आगामी सामन्यात तो खेळताना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.

Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

 RR vs PBKS यांच्यात रंगणार आहे सामना

राजस्थान रॉयल्सचा संघ २८ एप्रिल रोजी पंजाब किंग्सला भिडणार आहे. श्रेयस अय्यरच्या PBKS संघाने ७ पैकी सहा सामन्यात विजय नोंदवला असून एक सामना पावसामुळे अनिर्णत राहिला. पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध IPL च्या इतिहासातच नव्हे तर टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून दाखवला होता. अपराजित पंजाबविरुद्ध विजय मिळवून कमबॅक करण्याचे मोठे आव्हान राजस्थान रॉयल्ससमोर असेल. या परिस्थितीत वैभव सूर्यवंशी हा संघातील महत्त्वाचा खेळाडू असेल. कारण यंदाच्या हंगामात RR च्या संघाकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. 

गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ कितव्या स्थानी?

राजस्थान रॉयल्सच्या संघाने यंदाच्या हंगामाची सुरुवात ही सलग चार विजयासह केली. पण त्यानंतर संघाने पुढच्या चार सामन्यात फक्त एक विजय मिळवला आहे. रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थानच्या संघाने ८ पैकी ५ सामन्यातील विजयासह १० गुण कमावले असून गुणतालिकेत ते चौथ्या स्थानावर आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Suryavanshi injured after record century; will he play next match?

Web Summary : After a record century, Vaibhav Suryavanshi sustained a muscle injury. RR coach says he's being treated, not serious, and hopeful for next match against PBKS. RR aims to comeback after recent losses.
टॅग्स :आयपीएल २०२६राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्सवैभव सूर्यवंशी