महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेला बसलेल्या १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर "Class 12th Result 2026 Coming Soon" असा मेसेज दिसू लागला आहे, ज्याचा अर्थ असा की निकाल प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. साधारणपणे निकाल जाहीर होण्यापूर्वी अशी अपडेट तांत्रिक पडताळणीसाठी दिली जाते.
निकालाची संभाव्य तारीख आणि वेळविविध सूत्रांनुसार, निकाल मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. काही रिपोर्ट्सनुसार १३ मे ते २५ मे दरम्यान निकाल लागू शकतो. बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो.
निकाल ऑनलाइन कसा तपासायचा?निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.१. mahresult.nic.in२. hscresult.mkcl.org३. results.digilocker.gov.in४. mahahsscboard.in
निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव.
स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखांचे निकाल जाहीर करणार आहे. मागील वर्षी विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५% लागला होता. यावर्षीही निकालाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : Maharashtra Board 12th result likely in May first/second week. Check official websites like mahresult.nic.in. Keep hall ticket number and mother's name ready. All streams result to be out together.
Web Summary : महाराष्ट्र बोर्ड 12वीं का रिजल्ट मई के पहले/दूसरे सप्ताह में संभावित है। mahresult.nic.in जैसी आधिकारिक वेबसाइटों पर जांच करें। हॉल टिकट नंबर और मां का नाम तैयार रखें। सभी स्ट्रीम का रिजल्ट एक साथ जारी किया जाएगा।