वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरच्या वेळी गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख पटली आहे. संशयिताचे नाव कोल थॉमस ॲलन आहे. ॲलन हा दक्षिण कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे.
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हॉटेलमध्ये गोळीबार केल्यानंतर ॲलनला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. संशयिताने अधिकाऱ्यांसमोर कबूल केले की तो ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना लक्ष्य करत होता. तो सोमवारी न्यायालयात हजर होईल.
गोळीबारानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये एक पत्रकार परिषद घेतली, यामध्ये त्यांनी सांगितले की, संशयित मानसिक रुग्ण होता. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी संशयिताच्या प्रोफाइलची चौकशी सुरू करताच, अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
शिक्षक आणि व्हिडीओ गेम डेव्हलपर
तपासातून ॲलनबद्दल अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. ३१ वर्षीय ॲलन हा लॉस एंजेलिसजवळील टॉरन्स परिसराचा रहिवासी आहे. तो व्यवसायाने शिक्षक आणि व्हिडीओ गेम डेव्हलपर आहे.
ॲलनच्या लिंक्डइन प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, तो C2 एज्युकेशन नावाच्या शिकवणी कंपनीत अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करत होता. त्याला डिसेंबर २०२४ मध्ये "महिन्याचा सर्वोत्कृष्ट शिक्षक" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
ॲलनने २०१७ मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. गेल्या वर्षी, त्याने कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी-डोमिंगेझ हिल्समधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवीही मिळवली. यावरून तो एक उच्चशिक्षित व्यक्ती असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
Web Summary : Cole Thomas Allen, identified as the White House shooting suspect, targeted Trump officials. The 31-year-old engineer and video game developer, also a part-time teacher, held degrees from Caltech and CSU Dominguez Hills. Trump claimed Allen was mentally ill.
Web Summary : व्हाइट हाउस में गोलीबारी करने वाले संदिग्ध कोल थॉमस एलन की पहचान हुई, जिसने ट्रम्प के अधिकारियों को निशाना बनाया। 31 वर्षीय इंजीनियर और वीडियो गेम डेवलपर, जो अंशकालिक शिक्षक भी है, कैलटेक और सीएसयू डोमिंगुएज़ हिल्स से डिग्री प्राप्त की है। ट्रम्प ने दावा किया कि एलन मानसिक रूप से बीमार था।