पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील १५२ जागांसाठी ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यतील १४२ जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये तुंबळ लढाई सुरू आहे. त्यातच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर भवानीपूर विधानसभा मतदार संघात भाजपाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. तसेच दोन्ही बाजूंनी ईर्षेने प्रचार सुरू आहे. यादरम्यान, भवानीपूर मतदारसंघात शुभेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यात लढत होत असून, नुकतीच इथे दोन्ही नेत्यांची एकाच वेळी सभा झाली. अगदी हाकेच्या अंतरावर झालेल्या या दोन्ही सभांदरम्यान, भाजपाचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत असं काही घडलं की ज्यामुळे ममता बॅनर्जी कमालीच्या संतापल्या. तसेच काही वेळात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे सुरक्षा दलांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार भवानीपूर मतदारसंघातील एका सभेला संबोधित करत असताना ममता बॅनर्जी यांनी आपलं भाषण अचानक थांबवलं. आपलं भाषणं उपस्थितांना ऐकू येता कामा नये म्हणून इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या शुभेंदू अधिकारी यांच्या सभेतील स्पीकरचा आवाज हा जाणवपूर्वक मोठा ठेवण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच समर्थकांची माफी मागून सभेचा मंच सोडला.
यावेळी भाजपा हा घाबरवून, धमकावून बंगालवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. आता माझ्यासाठी ही सभा पुढे चालू ठेवणं शक्य नाही. जर माझ्या मतदारसंघात ते असं करत असतील तर समजून जा की भाजपा किती लोकशाही विरोधी आहे. जर ते असं काम करत राहिले तर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. ही अपमानास्पद बाब आहे. आता मी उद्या याच ठिकाणी एका सभेचं आयोजन करेन, असेही ममता बॅनर्जी यांनी पुढे सांगितले.
दरम्यान, ममता बॅनर्जी मंचावरून गेल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले. तसेच त्यांनी भाजपाची सभा असलेल्या ठिकाणी चाल केली. बघता बघता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले. तसेच एकीकडून जय बांगला तर दुसरीकडून जय श्रीराम अशा घोषणा दिल्या गेल्या.
Web Summary : Mamata Banerjee halted her speech, alleging BJP deliberately amplified speakers at Suvendu Adhikari's rally nearby. Supporters clashed, chanting slogans, prompting security intervention. Banerjee condemned BJP's actions as undemocratic and vowed legal action.
Web Summary : ममता बनर्जी ने भाषण रोका, आरोप लगाया कि भाजपा ने जानबूझकर शुभेंदु अधिकारी की रैली में स्पीकर बढ़ाए। समर्थकों की झड़प, नारेबाजी के बाद सुरक्षा हस्तक्षेप। बनर्जी ने भाजपा को अलोकतांत्रिक बताया, कानूनी कार्रवाई की कसम खाई।