CSK Captain Ruturaj Gaikwad Scores His First Fifty IPL 2026 : चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात अखेर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून यंदाच्या हंगामातील पहिली अर्धशतकी खेळी पाहायला मिळाले. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये सलामीवीर संजूसह अवघ्या २६ धावांवर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला तीन धक्के दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संघ अडचणीत असताना ऋतुराज शेवटपर्यंत थांबला अन्...
गुजरात विरुद्धच्या सामन्यात एका बाजूनं चेन्नईच्या विकेट पडत असताना धावांसाठी संघर्ष करत असलेल्या ऋतुराज गायकवाड शेवटपर्यंत मैदानात थांबला. त्याच्या आश्वासक खेळीच्या जोरावर चेन्नईच्या संघाने सुरुवातीच्या पडझडीनंतर निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १५८ धावांपर्यंत मज मारली.
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ११ सामन्यानंतर ऋतुराजच्या बॅटमधून आली फिफ्टी
गत हंगामात दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर ऋतुराज गायकवाड सातत्याने धावांसाठी संघर्ष करताना दिसला. फलंदाजीसाठी प्रतिकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याने ११ सामन्यानंतर अर्धशतक पूर्ण केले. एका बाजूला मोठे फटकेबाजी करण्याच्या नादात स्टार खेळाडूंनी विकेट गमावल्या. दुसरीकडे ऋतुराज गायकवाडनं संयमी खेळी करत ६० चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७४ धावांची नाबाद खेळी साकारली.
Web Summary : Ruturaj Gaikwad's unbeaten 74 rescued Chennai Super Kings from a top-order collapse against Gujarat. Despite wickets falling around him, Gaikwad anchored the innings, hitting 6 fours and 4 sixes in his first fifty after 11 matches, helping CSK reach a respectable total.
Web Summary : रुतुराज गायकवाड़ के नाबाद 74 रनों ने गुजरात के खिलाफ शीर्ष क्रम के पतन से चेन्नई सुपर किंग्स को बचाया। उनके चारों ओर विकेट गिरने के बावजूद, गायकवाड़ ने पारी को संभाला, 6 चौके और 4 छक्के लगाए, 11 मैचों के बाद अपना पहला अर्धशतक बनाया, जिससे सीएसके को सम्मानजनक स्कोर तक पहुंचने में मदद मिली।