Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 14:21 IST

Reliance Industries Limited : गेल्या वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

Reliance Industries Limited : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रात  अभूतपूर्व यश मिळवत नवा इतिहास रचला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ₹९५,६१० कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. यासह, वार्षिक $१० अब्ज (सुमारे ₹८४,००० कोटी) पेक्षा जास्त नफा कमावणारी रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

वार्षिक कामगिरीत दमदार वाढ

गेल्या वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रिलायन्सचा नफा ₹८०,७८७ कोटी होता, जो २०२५-२६ मध्ये वाढून ₹९५,६१० कोटींवर पोहोचला. म्हणजेच कंपनीने सुमारे १८% वार्षिक वाढ नोंदवली आहे. याशिवाय, कंपनीने महसूल आणि EBITDA या दोन्ही बाबतीत विक्रमी कामगिरी केली आहे.

एकूण महसूल: ₹११,७५,९१९ कोटी (आतापर्यंतचा उच्चांक)EBITDA: ₹२,०७,९११ कोटी (रेकॉर्ड स्तर)

तिमाही निकालात किंचित घसरण

वार्षिक कामगिरी मजबूत असली तरी, मार्च २०२६ तिमाहीत थोडीशी घसरण दिसून आली. चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ₹१६,९७१ कोटी राहिला, जो मागील वर्षीच्या ₹१९,४०७ कोटींपेक्षा कमी आहे.

यामागील प्रमुख कारणे:

ऑइल-टू-केमिकल्स (O2C) व्यवसायातील कमकुवत कामगिरीवाढलेला खर्च

जिओ आणि रिटेलचा मोठा वाटा

कंपनीच्या वाढीत कंझ्युमर बिझनेसचा मोठा वाटा आहे. Jio Platforms ने उत्तम कामगिरी करत महसूल वाढवला, तर Reliance Retail ने २०,००० स्टोअर्सचा टप्पा पार केला आहे. या दोन्ही विभागांनी कंपनीच्या एकूण उत्पन्नाला मजबूत आधार दिला आहे.

मार्केट कॅपमध्येही आघाडी

बाजार मूल्यात रिलायन्सने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मोठी आघाडी घेतली आहे. कंपनीचे बाजार मूल्य ₹१८ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. तुलनेत, HDFC Bank आणि State Bank of India (SBI) यांसारख्या दिग्गज कंपन्या अजूनही या पातळीपासून दूर आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Reliance First Indian Company to Surpass $10 Billion Annual Profit

Web Summary : Reliance Industries sets a new record, becoming the first Indian firm to exceed $10 billion in annual profit with ₹95,610 crore net profit. Jio and Retail contributed significantly.
टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स