शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

'ती' भेट ठरली जीवघेणी! प्रेयसीला लपूनछपून भेटणं पडलं महागात, गावकऱ्यांनी केली तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 9:15 AM

प्रेयसीला लपूनछपून भेटणं एका प्रियकराला चांगलंच महागात पडलं आहे. रात्रीची भेट त्याच्या जीवावर बेतली आहे. 

पाटना - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये एकमेकांना भेटणं थोडसं कठीण झालं आहे. मात्र प्रेमात पडलेली मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी नानाविध शक्कल लढवत असलेल्या पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला लपूनछपून भेटणं एका प्रियकराला चांगलंच महागात पडलं आहे. रात्रीची भेट त्याच्या जीवावर बेतली आहे. 

प्रेमासाठी काही जण वाटेल ते करायला तयार होतात. अशीच एक घटना पाटणामध्ये घडली आहे. प्रेयसीला रात्री लपूनछपून भेटायला जाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या गावी गेला. मात्र मुलीच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी त्याला पकडलं आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच तरुणाचा एक मित्रही त्याला मदत करण्यासाठी त्याच्यासोबत होता. त्यालाही गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या शेखपुरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराला प्रेयसीच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या मित्राची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हिरा कुमार असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव होतं. तो कोचगावचा रहिवासी होता. आपल्या प्रेयसीला भेटायला हिरा तिच्या गावी आला होता. 

रात्री लपूनछपून भेटत असताना काही लोकांनी त्यांना पकडलं आणि मुलीच्या नातेवाईकांना त्यांची माहिती दिली. या घटनेनंतर गावकरी देखील जमा झाले आणि त्यांना प्रियकर आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला 

राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती

देशी युद्धनौका INS Vikrant मारणार अथांग समुद्रात सूर; 26 लढाऊ विमानांसह चाचणी सुरू

Sushant Singh Rajput Case : सुशांतच्या पोस्टमॉर्टममध्ये काहीतरी गडबड?, CBI ला शंका; डॉक्टर संशयाच्या फेऱ्यात

मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस