Sushant Singh Rajput Case : सुशांतच्या पोस्टमॉर्टममध्ये काहीतरी गडबड?, CBI ला शंका; डॉक्टर संशयाच्या फेऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:51 PM2020-08-22T12:51:57+5:302020-08-22T13:10:15+5:30

Sushant Singh Rajput Case : सुशांतचं पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर आणि एक्सपर्टच्या टीमची सीबीआयचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

sushant singh rajput autopsy report examine forensic department dr sudhir gupta | Sushant Singh Rajput Case : सुशांतच्या पोस्टमॉर्टममध्ये काहीतरी गडबड?, CBI ला शंका; डॉक्टर संशयाच्या फेऱ्यात

Sushant Singh Rajput Case : सुशांतच्या पोस्टमॉर्टममध्ये काहीतरी गडबड?, CBI ला शंका; डॉक्टर संशयाच्या फेऱ्यात

googlenewsNext

नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयाने केल्या आहेत. सुशांतचं पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर आणि एक्सपर्टच्या टीमची सीबीआयचे अधिकारी चौकशी करणार आहेत. सीबीआयला पोस्टमॉर्टम नीट झालं की नाही, रिपोर्टमध्ये काही गडबड आहे का? याबाबत शंका असल्याचं म्हटलं जात आहे. 

सीबीआय मुंबई पोलिसांना देखील पोस्टमॉर्टमसंदर्भात काही प्रश्न विचारू शकते. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींची नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा तपास करण्यासाठी सीबीआयने नियुक्त केलेल्या फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि AIIMS चे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी देखील रिपोर्टबाबत शंका उपस्थित केली आहे. 

डॉ सुधीर गुप्ता यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वेळेचा कॉलम रिकामा का? असा सवाल केला आहे. टाईम स्टँप नसल्याचं म्हटलं आहे. आजतकशी बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 'ही एक गंभीर बाब आहे. पोलिसांना याबाबत डॉक्टरांना प्रश्न विचारणे आवश्यक होते की वेळेचा कॉलम रिकामा का आहे? मात्र पोलिसांनी असे केले नाही' अशी प्रतिक्रिया डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिली आहे. तसेच या पोस्टमॉर्टम अहवालाचा संपूर्ण तपास करण्यासाठी त्यांना 3 ते 4 दिवसांचा कालावधी जाणार आहे असं देखील सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले...

सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर के. के. सिंह यांनी एक विधान केलं आहे. सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या संपत्तीचा कायदेशीर वारस म्हणून स्वतःचं नाव दिलं आहे. के. के. सिंह यांनी ' मी सुशांतसिंह राजपूतच्या संपत्तीचा कायदेशीर वारस आहे. सुशांतने ज्या वकील, सीए आणि इतर कर्मचाऱ्यांना ठेवले होते आणि अन्य लोकंही जे त्याच्यासाठी काम करत होते ते आता सर्व संपलं आहे. आता त्यांना सुशांतबद्दल सांगण्याचा किंवा बोलण्याचा कोणताही अधिकार नाही' असं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला

19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक

मोठी कारवाई! दिल्लीच्या धौला कुआंमध्ये चकमक, ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक, स्फोटकांचा साठा जप्त

"... आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या, मोदी खोटं बोलत नाहीत असा एकही दिवस नाही"

Video: 'एक साथ नमस्ते'; भारतीय संस्कृतीतील संस्कार असलेल्या 'नमस्कारा'ची जादू सातासमुद्रापार

Web Title: sushant singh rajput autopsy report examine forensic department dr sudhir gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.