मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 11:49 AM2020-08-22T11:49:57+5:302020-08-22T12:08:23+5:30

मोबाईल बँकिंग दरम्यान काय काळजी घ्यावी यासाठी युजर्संना सूचना केल्या आहेत. 

sbi warns users of online banking fraud suggest few steps to follow | मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला

मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला

Next

नवी दिल्ली - बँकेचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने अगदी कमी वेळात सहज आणि वेगाने होतात. त्यामुळेच ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याकडे हल्ली अनेकांचा अधिक कल असतो. इंटरनेट आणि स्मार्टफोन्समुळे बँकिंग खूपच सोपे केले आहे. मात्र सध्या ऑनलाईन फ्रॉड वाढले आहेत. अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मोलाचा सल्ला दिला आहे. मोबाईल बँकिंग दरम्यान काय काळजी घ्यावी यासाठी युजर्संना सूचना केल्या आहेत. 

फोनच्या IMEI नंबर नोट करुन ठेवा

फिशिंग किंवा फ्रॉड प्रकरणात फोनच्या IMEI नंबरची गरज असते. त्यामुळे हँडसेटचा IMEI नंबर लिहून ठेवा. डिव्हाईसच्या IMEI नंबरसाठी सेटिंग अ‍ॅप्समध्ये जावू शकता. तसेच फोनवरून *#06# डायल करूनही IMEI नंबर मिळवता येतो. .

वेळोवेळी घ्या डेटा बॅकअप 

स्टेट बँक ऑफ इंडियाने युजर्संना फोनमध्ये डेटा बॅकअप घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास डेटाला ट्रॅक आणि सिक्योर करता येतो. तसेच एक्स्ट्रा सिक्योरिटी साठी पिन कोड पासकोड किंवा बायोमॅट्रिक पासवर्डने प्रोटेक्ट करा.

डेटा ट्रान्सफर करताना त्याला स्कॅन करा

संगणकाहून मोबाईलवर डेटा ट्रान्सफर करण्याआधी त्याला अँटी व्हायरसने स्कॅन करा. यामुळे मोबाईल करप्ट किंवा व्हायरस असलेली फाईल मोबाईलमध्ये एंटर होणार नाही. स्टेप मोबाईल आणि मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या युजरचे बँकिंग डिटेल्सची सिक्योरिटीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

फोन करा अपडेट 

फोनला नेहमी लेटेस्ट सॉफ्टवेअरने अपडेट ठेवा. नवीन फीचर्ससोबत मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स मध्ये लेटेस्ट सिक्योरिटी पॅच दिला आहे. हे डिव्हाईसला व्हायरस अटॅकच्या धोक्यापासून वाचवण्यात मदत करते.

पासवर्ड आणि युजरनेम सेफ ठेवा 

फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी फोनमध्ये कधीही बँकिंग पासवर्ड, युजरनेम किंवा एटीएम पिन सेव्ह करू नका. जर असे असेल तर लॉक फीचर जरूर ठेवा.

कधीच करू नका या चुका 

फोन आणि डेटाची सिक्योरिटीसाठी सर्वात आधी फोनला आपल्यापासून दूर ठेवू नका. तुम्ही ज्या अ‍ॅपचा वापर करत नसाल तर ते डिलीट करा. तसेच कोणत्याही सार्वजनिक वायफाय नेटवर्क्सचा वापर करू नका. त्याला फोन कनेक्ट करू नका.

महत्त्वाच्या बातम्या

19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक

मोठी कारवाई! दिल्लीच्या धौला कुआंमध्ये चकमक, ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक, स्फोटकांचा साठा जप्त

"... आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या, मोदी खोटं बोलत नाहीत असा एकही दिवस नाही"

Video: 'एक साथ नमस्ते'; भारतीय संस्कृतीतील संस्कार असलेल्या 'नमस्कारा'ची जादू सातासमुद्रापार

सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले...

Web Title: sbi warns users of online banking fraud suggest few steps to follow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.