Video: चौकार-षटकार...; बुमराहची फलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी पांड्याला केले ट्रोल

मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहचा हा व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे पांड्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 06:49 PM2024-04-26T18:49:50+5:302024-04-26T18:50:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL Bumrah Batting Video: Fours-Sixes; Netizens trolled Pandya after seeing Bumrah's batting | Video: चौकार-षटकार...; बुमराहची फलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी पांड्याला केले ट्रोल

Video: चौकार-षटकार...; बुमराहची फलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी पांड्याला केले ट्रोल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Bumrah Batting Video:मुंबई इंडियन्ससाठी IPL 2024 बऱ्याच चढ-उतारांनी भरलेले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यात फक्त 3 साम्यात विजय मिळाला, तर 5 सामन्यात पराभव झाला. मुंबईचा पुढील सामना 27 एप्रिल रोजी दिल्लीविरोधात होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसला. विशेष म्हणझे, तो एखाद्या फलंदाजाप्रमाणे फटके मारत होता. त्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला ट्रोल केले.

Mi ने शेअर केला व्हिडिओ
मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जसप्रीत बुमराह नेट्समध्ये तुफान फटकेबाजी करताना दिसतोय. बुमराह एकापाठोपाठ एक मोठे शॉट मारत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'आज तुझा भाऊ फलंदाजी करणार!' असे लिहिले आहे. नेटकरी या पोस्टवर कमेंट्स करुन बुमराहचे कौतुक तर पांड्याला ट्रोल करत आहेत. 

हार्दिक पांड्या ट्रोल...
बुमराहची ही फलंदाजी पाहून लोकांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केले. एका यूजरने लिहिले की, 'हार्दिकच्या फलंदाजीवर कोणालाच विश्वास नाही, त्यामुळे प्रत्येकजण फलंदाजी करत आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'T20 मध्ये हार्दिक पांड्यापेक्षा चांगला फलंदाज, हार्दिक पांड्यापेक्षा चांगला ऑलराउंडर.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'बुमराह पांड्याला ट्रोल करतोय का?' 

बुमराहची आयपीएलमध्ये सर्वोत्त गोलंदाजी
IPL 2024 मध्ये जसप्रीत बुमराहने आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. तो 8 सामन्यात 13 विकेट्स घेऊन स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. याशिवाय, त्याचा इकॉनॉमी रेटही सर्वात कमी 6.37 आहे. 

Web Title: IPL Bumrah Batting Video: Fours-Sixes; Netizens trolled Pandya after seeing Bumrah's batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.