शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 08:23 IST

दिल्लीत झालेल्या स्फोट प्रकरणात डीएनए चाचणीतून धक्कादायक खुलासा झाला आहे.

Delhi Blast DR. Umar Un Nabi:दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या भीषण कार स्फोटामागे कार्यरत असलेल्या 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल'चा उलगडा झाला आहे. या मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार आणि स्फोटकांनी भरलेली ह्यूंडई आय२० कार चालवणारा दहशतवादी डॉक्टर उमर नबीच असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. स्फोट झालेल्या कारच्या ढिगाऱ्यात सापडलेला जळालेला मृतदेह हा उमरच्या कुटुंबीयांच्या डीएनए नमुन्यांशी जुळला आहे. प्रतिष्ठित पेशाचा वापर दहशतवादासाठी करणाऱ्या या नेटवर्कमुळे देशात खळबळ माजली आहे.

डॉ. उमर नबी भट हा मूळचा पुलवामा येथील रहिवासी होता. तो एक अत्यंत हुशार विद्यार्थी होता. तयाने श्रीनगरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि त्यानंतर एमडीची पदवी मिळवली होती. नीट-पीजी परीक्षेतही तो अव्वल ठरला होता. फरीदाबाद येथील अल-फलाह युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये तो सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. त्याच्यासारखा उच्चशिक्षित व्यक्ती दहशतवादाकडे वळल्याने सुरक्षा यंत्रणांना मोठा धक्का बसला आहे.

व्हाईट कॉलर मॉड्यूल

या मॉड्यूलमध्ये फक्त डॉक्टरच नव्हे, तर मौलवी आणि इतर उच्चशिक्षित तरुणही सामील होते. जम्मू आणि काश्मीर ते हरियाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत या नेटवर्कचा विस्तार होता. यातील सदस्य एनक्रिप्टेड ॲप्स आणि टेलिग्राम चॅनेल्सचा वापर करून कट्टरपंथी बनले होते. फरीदाबाद येथील शैक्षणिक संस्थांना त्यांनी आपल्या कारवायांचे केंद्र बनवले होते. उमर नबी व्यतिरिक्त, अल-फलाह युनिव्हर्सिटीमधील दुसरे डॉक्टर मुझम्मिल अहमद गनाई आणि डॉ. आदिल मजीद राथर यांनाही अटक करण्यात आली आहे.

मुझम्मिलच्या चौकशीतून फरीदाबाद येथे स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. एका ठिकाणी तब्बल २,९०० किलो स्फोटके सापडली होती, ज्यामुळे या मोठ्या हल्ल्याच्या तयारीचा अंदाज येतो. उमर नबी तुर्कीयेतील अंकारा येथे असलेल्या UKasa नावाच्या हँडलरच्या संपर्कात होता. तो आणि मुझम्मिल दोघेही २०२१ मध्ये तुर्कीयेला गेले होते, जिथे त्यांचा जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल-हिंद यासारख्या दहशतवादी संघटनांच्या ओव्हरग्राउंड वर्कर्सशी संपर्क आल्याची शंका आहे.

लाल किल्ल्याजवळील स्फोटाचे कारण

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, डॉ. उमर नबी आणि त्याच्या साथीदारांनी ६ डिसेंबरच्या आसपास मोठा स्फोट घडवण्याची योजना आखली होती. मात्र, स्फोट होण्याच्या काही दिवस आधी मुझम्मिल आणि इतरांना अटक झाली आणि प्रचंड स्फोटकांचा साठा जप्त झाल्याची बातमी कळताच, उमर घाबरला. सुरक्षा यंत्रणांच्या दबावाखाली घाबरून त्याने १० नोव्हेंबरच्या संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ स्फोटकांनी भरलेली कार उडवून दिली, ज्यात तो स्वतःही मारला गेला. केंद्र सरकारने या घटनेला 'दहशतवादी हल्ला' म्हणून घोषित केले असून एनआयए या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast Mystery Solved: Body in Car Identified as Dr. Nabi

Web Summary : Delhi blast's 'white collar terror module' exposed. Dr. Umar Nabi, the mastermind, died in the explosion. He used encrypted apps, had ties to terror groups, and planned a larger attack before panicking and detonating the car near Red Fort.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटCrime Newsगुन्हेगारी