वसंत व्याख्यानमालेची ९८वी वार्षिक सर्वसधारण बेकायदेशीर असल्याचा आरोप संस्थेच्या माजी कार्यवाह रमेश जुन्नरे यांनी केला होता. परंतु, द्वारका परिसरातील संस्थेच्या सभागृहात झालेल्या सभेला स्वत: जुन्नरेच उपस्थित राहिले नाही. ...
‘भिन्न षड्ज’ रागातील बंदिशींसह विविध भावगीते आणि नाट्यगीतांच्या बहारदार शैलीतील गायनाने ख्यातनाम गायिका सुमेधा देसाई यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...
वाहतूक कोंडीला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीचालकाला मोटार सुरक्षितठिकाणी हलविण्यास सांगितल्याचा राग येऊन दुचाकीचालकाने कर्तव्य बजावणाºया पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित दुचाकीचालकाला अटक केली आहे. ...
वसंत व्याख्यानमाला नाशिक या संस्थेच्या ज्ञानसत्राचा शुभारंभ बुधवार, दि. १ मेपासून होणार आहे. महिनाभर चालणाऱ्या व्याख्यानमालेचे यंदा ९८वे वर्ष असून, बाहेरगावच्या मान्यवर वक्त्यांबरोबर स्थानिक वक्त्यांना प्राधान्य दिले आहे. ...
: परिसरातील गंगाघाट, हिरावाडी तसेच अयोध्यानगरी भागात बुधवारी, सोमवारी व शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ...
ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आज जगासमोर उभी ठाकली असून, त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. बायोडायव्हरसिटी जैवविविधतेकडे लक्ष वेधणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पक्षीतज्ज्ञ सतीश गोगटे यांनी केले. ...
कलानगर येथील कृष्णकांत भाजीमार्केटला वाहनतळाची सोय नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तातडीने वाहनतळाची सोय करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
छावणी परिषदेच्या हद्दीत गेल्या दीड वर्षापासून संथगतीने सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामुळे वाहनधारक व उडणाऱ्या धुळीमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. ...
मंदार वैद्य यांना नुकतेच आॅर्डर आॅफ आॅस्ट्रेलिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आॅस्ट्रेलियन नागरिकांनी समाजासाठी विविध क्षेत्रांत बहुमूल्य योगदान दिले आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. ...
नाशिक शहरात दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानाच्या तीव्रतेने घामाच्या धारा निघत असताना इंदिरानगर परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...