शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat : अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:05 IST

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात याने उरणमध्येही जमीन खरेदी केली असल्याचे उघडकीस आले आहे.

भोंदू अशोक खरात याने उरणमध्येही जमीन खरेदी केली असल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय दराने खरेदीखत करून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात जमीन खरेदी-विक्रीत अडीच ते तीन कोटींचा व्यवहार झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या २० गुंठे जमिनीची केवळ ५८ लाख ५० हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहे.

कल्पना खरातच्या नावावर उरण चाणजे महसूल हद्दीतील सर्व्हे नं. ३७१/३८ मध्ये २० गुंठे जमीन ५८ लाख ५० हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहे. त्याची नोंदणी १२ मार्च २०२६ रोजी येथील दुय्यम निबंधक सहकारी कार्यालयात झाली आहे. त्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी फेरफार मंजुरी आणि कल्पना खरातच्या नावाने सातबारा उतारा तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. 

भोंदू खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर, भक्तांची यादी ईडीच्या ताब्यात

पुढील कार्यवाहीसाठी कुणीही पुढे आले नसल्याने नोंदी रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कद‌म यांनी दिली.  चाणजे महसुली हद्दीतील करंजा मच्छीमार बंदर, करंजा-रेवस सागरी सेतू, रो-रो सेवा यामुळे या परिसरातील जागा, जमिनींचे भाव आकाशाला भिडले आहेत. येथील जमिनीचा प्रतिगुंठा १४ ते १५ लाखांपर्यंत खरेदी-विक्री केली जात असल्याची माहिती चाणजे ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच अजय म्हात्रे यांनी दिली.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी

खरात विरुद्ध सिन्नरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल

सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत भोंदू अशोक खरात याने ३२ खाती उघडल्याचे प्रकरण समोर आले आहे. यात फिर्यादीच्या खात्यातून ५७ लाख ९० हजार ९७९ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अशोक एकनाथ खरात याच्यासह पतसंस्थेचे व्यवस्थापक, कर्मचारी व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती

नारायण रामचंद्र घोटेकर (रा. घोटेवाडी, ता. सिन्नर) यांनी फिर्याद दिली. तक्रारीनुसार १० ऑगस्ट २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत खरात व संबंधितांनी फिर्यादीसह ३२ व्यक्तींची बनावट खाती पतसंस्थेत उघडली.

 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक

खाते उघडताना आवश्यक ओळख पडताळणी, आधार व पॅन कार्ड तपासणी तसेच ओळखदारांची माहिती घेण्याची प्रक्रिया न पाळता हे व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे फिर्यादीची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण पुढील तपास करीत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fraudster Kharat's wife owns land in Uran; Suspicion of crore deals.

Web Summary : Fraudster Ashok Kharat's wife owns 20 Guntha land in Uran. Land purchased at government rates, but suspected transactions worth crores. Police filed fraud case against Kharat in Sinnar for misappropriating funds from a cooperative society, involving 32 accounts and a significant amount of money.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस