दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीची तिच्याच घरात एका भीषण घटनेत हत्या करण्यात आली. दक्षिण-पूर्व दिल्लीत एका आयआरएस अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तिची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. शवविच्छेदन अहवालानंतर लैंगिक अत्याचाराची पुष्टी होईल. पोलीस तपास करत असून, प्राथमिक तपासात नुकतेच कामावरून काढून टाकलेल्या एका नोकरावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
बुधवारी ईस्ट ऑफ कैलास येथील अमर कॉलनीमध्ये एका आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या घरी हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना अधिकाऱ्याच्या मुलीचा गळा दाबून खून केलेला मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल चार्जरच्या केबलने तिचा गळा दाबण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तिच्या चेहऱ्यावर अनेक खोल व्रण होते. मृत मुलीचे वडील १९९७ च्या बॅचचे आयआरएस कस्टम अधिकारी आहेत.
पीडित मुलगी घरी एकटीच होती
पोलिसांच्या माहितीनुसार, कुटुंबीयांना घरात मुलीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला आणि त्यांनी या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी तात्काळ एक पथक पाठवण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, गळा दाबून हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. मृत मुलगी अंदाजे २२ वर्षांची होती आणि कुटुंबीयांच्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ती घरी एकटीच होती. मृत मुलीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ती यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती.
सुमारे महिनाभरापूर्वी कामावरून काढून टाकलेल्या एका घरगुती नोकराने हा गुन्हा केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. संशयित फरार असल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.
Web Summary : In Delhi, an IRS officer's 22-year-old daughter was found murdered in her home. Police suspect rape before strangulation with a mobile charger. A former domestic helper is the prime suspect, and a manhunt is underway. The victim was preparing for UPSC exams.
Web Summary : दिल्ली में एक IRS अधिकारी की 22 वर्षीय बेटी की घर में हत्या कर दी गई। पुलिस को बलात्कार के बाद मोबाइल चार्जर से गला घोंटने का संदेह है। एक पूर्व घरेलू सहायक मुख्य संदिग्ध है, और उसकी तलाश जारी है। पीड़िता यूपीएससी परीक्षा की तैयारी कर रही थी।