Donald Trump on 8 iranian women: इराण-अमेरिका यांच्यातील संघर्षादरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली. एका व्यक्तीची पोस्ट त्यांनी शेअर केली आणि या महिलांना सोडा, ही चर्चेची खूप चांगली सुरूवात असेल, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी जी पोस्ट शेअर केली आहे, त्यात इराण या आठ महिलांना फासावर लटकवणार असल्याचे म्हटले आहे. या सगळ्या प्रकरणावर इराणनेही उत्तर दिले आहे.
एका व्यक्तीने आठ महिलांचे फोटो शेअर माहिती दिली की, इराण या आठ महिलांना फाशी देण्याची तयारी करत आहे. याविषयावर आंतरराष्ट्रीय समुदायाने आणि तथाकथित मानवाधिकार संघटनांनी तोंडही उघडले नाही.
त्या महिलाही याचा आदर करतील -डोनाल्ड ट्रम्प
हीच पोस्ट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केली आणि म्हणाले की, "माझ्या प्रतिनिधींशी जे लवकर चर्चा करणार आहे, त्या इराणी नेत्यांना आवाहन आहे की, या महिलांची सुटका केल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी राहीन. मला खात्री आहे की तुम्ही केलेल्या या कृतीचा या महिला नक्कीच आदर करतील. त्यांना कोणतीही दुखापत करू नका. ही आपल्या चर्चेची खरंच खूप चांगली सुरूवात असेल."
दिशाभूल केली जात आहे, इराणचे प्रत्युत्तर
डोनाल्ड ट्रम्प यांनी जी माहिती पोस्ट केली, ती इराणने फेटाळून लावली आहे. ही फेक न्यूज असल्याचे इराणच्या न्याय व्यवस्थेने म्हटले आहे.
इराणमध्ये न्यायालयीन कामकाजाचे रिपोर्ट करणाऱ्या मिजान वृत्त संस्थेने म्हटले आहे की, या महिलांच्या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, यातील काही महिलांना आधीच मुक्त करण्यात आले आहे.
'ट्रम्प फेक न्यूजला बळी पडले आहेत'
"उर्वरित ज्या महिला कैदेत आहेत, त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप आहे की, ते सिद्ध झाले तरी त्यांना कारावासाची शिक्षा होऊ शकते, फाशीची नाही. कोणत्याही महिलेला आतापर्यंत अशी शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा फेक न्यूजला बळी पडले आहेत", असे मिजानच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
या आठ महिलांना आंदोलन करताना पकडण्यात आले होते आणि अटक करण्यात आली होती. चालू वर्षामध्येच इराणमध्ये मोठे आंदोलन झाले होते.
Web Summary : Trump appealed to Iran to release eight women facing execution, but Iran's judiciary refuted the claims, calling them fake news and stating no women face the death penalty for current charges.
Web Summary : ट्रंप ने ईरान से आठ महिलाओं को रिहा करने की अपील की, जिन पर फांसी का खतरा मंडरा रहा था, लेकिन ईरान की न्यायपालिका ने दावों का खंडन करते हुए उन्हें झूठी खबर बताया और कहा कि वर्तमान आरोपों के लिए किसी भी महिला को मौत की सजा नहीं दी जाएगी।