शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:34 IST

अमेरिका-इराण युद्धविराम, बारामती पोटनिवडणूक यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घड�..

22 Apr, 26 12:34 PM

वणी तालुक्यात दुर्मिळ जीवाश्मांचा मोठा शोध; हत्ती, बायसन, हरिणासह पाषाणयुगीन अवजारे आढळली

वणी तालुक्यातील जुगात व आपटी परिसरात वर्धा नदीकिनारी अत्यंत दुर्मिळ जीवाश्मांचा मोठा शोध लागला आहे. प्रा. सुरेश चोपणे यांच्या संशोधनातून हत्ती, बायसन, हरिण, रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांचे जीवाश्म तसेच मानवी हाडांचे अवशेष आणि पाषाणयुगीन अवजारे आढळली आहेत. ही जीवाश्मे सुमारे २० हजार वर्षांपूर्वीच्या प्लेइस्टोसीन (हिमयुगीन) काळातील असल्याची माहिती त्यांनी दिली.

22 Apr, 26 12:33 PM

खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर

भोंदू अशोक खरातची नाशिक व सिन्नरमधील प्रत्येकी दोन बँक खाती ईडीने तपासली असून, त्यातील काही संशयित व्यवहार चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. खरातने जे बोगस खाते उघडले होते त्यातून खरात व त्याच्या पत्नीच्या चार खात्यांवर पैसे ट्रान्सफर झाल्याचे तपासात उघड झाल्याने ईडीने खरात व त्याच्या पत्नीच्या बँक खात्यांचे मागील दहा वर्षापासूनचे विश्लेषण सुरू केले आहे. वाचा सविस्तर

22 Apr, 26 11:37 AM

पुरून ठेवलेला पुरुषाचा सापळा पोलिसांनी काढला बाहेर, मेहकर तालुक्यातील जामगाव शिवारातील घटना

मेहकर जवळच असलेल्या जामगाव शिवारात एक अतिशय दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे. जामगाव शिवारात काही वर्षापूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह पुरलेला आहे..या गुप्त माहितीवरून जिल्हा पोलीस निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे मेहकरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार व त्यांचे पूर्ण सहकारी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व इतर सर्व टीम ने जेसीबीद्वारे जामगाव शिवारात एका ठिकाणी खोदकाम करून त्या ठिकाणी एका पुरुष जातीचा सापळा सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी दिली आहे. 

22 Apr, 26 11:36 AM

खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची ६ तास चौकशी

नाशिक भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणात अत्यंत महत्त्वाची घडामोड मंगळवारी घडली. एसआयटीकडून शहरातील एका मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची प्रदीर्घ चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित व्यावसायिक आणि खरात यांच्यातील जमीन व्यवहार तसेच अन्य बाबींचीही विचारपूस यावेळी करण्यात आली. शहरात मध्यंतरी वादग्रस्त ठरलेल्या आणि 'गोल्डन गँग' म्हणून चर्चेत असणाऱ्या कंपूमध्ये या हॉटेल व्यावसायिकाचा बोलबाला होता. वाचा सविस्तर

22 Apr, 26 11:29 AM

दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा

कधीकधी वेळ फक्त सरत नाही, तर ती आतपर्यंत जखम देऊन जाते. २२ एप्रिलची तारीख २६ कुटुंबांसाठी भयंकर ठरली आहे, त्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात आपल्या माणसांना गमावलं. आज एक वर्ष उलटलं आहे, पण दुःख तसंच आहे. कानपूरच्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या जेव्हा या दिवसाची आठवण काढतात, तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात. "फक्त माझ्यासाठीच नाही, तर त्या सर्व २६ कुटुंबांसाठी हे वर्ष अत्यंत कठीण गेलं असेल" असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर

22 Apr, 26 11:17 AM

जळगाव: ग्रामपंचायतीकडून मृत्यू दाखल्यांची ऑनलाइन नोंदच नाही; प्रकार उघड

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील रहिवासी सहीदाबी गुलामरसुल मण्यार यांच्या पतीचे दि. 15/08/2025 रोजी निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी खडकदेवळा खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात नियमानुसार मृत्यूची नोंद केली होती. मात्र, ही नोंद फक्त ऑफलाइनच करण्यात आली असून संबंधित ग्रामपंचायतीने तिची ऑनलाइन नोंदणी केलेली नसल्याचे उघड झाले आहे.

22 Apr, 26 10:34 AM

शांतता चर्चा सुरू असतानाच मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”

अमेरिका आणि इराण यांच्यात दुसऱ्या शांतता बैठकीसाठी पााकिस्तान प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून असिम मुनीर यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलून त्यांना सांगितले की, इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर लादलेली नाकेबंदी आहे, ज्यामुळे इराण चर्चेसाठी इस्लामाबादला जाण्यास तयार नाही. असिम मुनीर यांनी ट्रम्प यांना माहिती दिल्याचे वृत्त असले तरी, काही तासांनंतर व्हाइट हाऊसच्या रिपोर्टरने सांगितले की, मुनीर यांनी होर्मुझ नाकेबंदीवर चर्चा केली नव्हती. 

22 Apr, 26 10:32 AM

“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा स्पष्ट संदेश

22 Apr, 26 10:23 AM

₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मंगळवारी डिजिटल पेमेंट प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाचं कार्ड पुन्हा जारी म्हणजेच रिइश्यू झालं, तर जुन्या कार्डवर सुरू असलेले ई-मँडेट नवीन कार्डवर आपोआप ट्रान्स्फर केले जाऊ शकतील.

22 Apr, 26 10:22 AM

शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली

बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड घसरणीसह झाली. बाजार उघडल्यानंतर लगेचच सेन्सेक्स ४७० अंकांनी खाली येत ७८,८०२ च्या पातळीवर व्यवहार करू लागला. निफ्टीमध्येही १२१ अंकांची घसरण होऊन तो २४,४५५ वर पोहोचला, तर बँक निफ्टी २०२ अंकांनी घसरून ५७,१६८ वर व्यवहार करत होता. 

22 Apr, 26 10:12 AM

डोनाल्ड ट्रम्प यांचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला, होर्मुझवरूनही सुनावले

अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी वाढवण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असली तरी, इराणने प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. तसेच, अमेरिकेने केलेली नौदल नाकेबंदी ही 'युद्धासाठी प्रवृत्त करण्याची कृती' असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे.

22 Apr, 26 10:08 AM

इराण-अमेरिका युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम! डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मुदत संपण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामाला मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे पश्चिम आशियातील युद्धाचे ढग तूर्तास सरले असून राजकीय चर्चेला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.

टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक 2026Sunetra Pawarसुनेत्रा पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस