500 Rs Notes Printing: आपण आपल्या दैनंदिन जीवनात ५०० रुपयांच्या नोटेचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो, परंतु ही नोट नेमकी कशी बनते आणि ती छापण्यासाठी किती खर्च येतो याचा कधी विचार केला आहे का? नुकतीच रिझर्व्ह बँकेनं (RBI) या प्रक्रियेबद्दल महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
कोणतीही नोट बाजारात येण्यापूर्वी तिची रचना तयार केली जाते. त्यानंतर त्यात सिक्युरिटी फीचर्सचा समावेश केला जातो आणि मग छपाई प्रक्रिया पार पडते. बनावट नोटा रोखण्यासाठी प्रत्येक नोट खास कागद आणि शाई वापरून तयार केली जाते. भारतात नोटा छापण्यासाठी एकूण ४ हाय-सिक्योरिटी प्रेस आहेत. महाराष्ट्रातील नाशिक आणि मध्य प्रदेशातील देवास येथील प्रेस 'सिक्योरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड' (SPMCIL) अंतर्गत येतात. तर कर्नाटकमधील म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील सालबोनी येथील प्रेस 'भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड' (BRBNMPL) द्वारे चालवल्या जातात.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
नोटा छापण्याचा अधिकार आणि निर्णय
नोटा छापण्याचा अधिकार केवळ आरबीआयकडे असतो. किती नोटा छापायच्या, त्यांची रचना कशी असेल आणि त्यासाठी कोणतं साहित्य वापरलं जाईल हे आरबीआयच ठरवते. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर प्रेसमध्ये छपाईचं काम सुरू केलं जातं.
५०० रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो
५०० रुपयांची एक नोट छापण्यासाठी सरकारला साधारणपणे २.२९ रुपये खर्च येतो. म्हणजेच ५०० रुपये मूल्य असलेल्या या नोटेचा निर्मिती खर्च अत्यंत कमी आहे. याव्यतिरिक्त, २०० रुपयांच्या नोटेसाठी सुमारे २.३७ रुपये आणि १०० रुपयांच्या नोटेसाठी सुमारे १.७७ रुपये खर्च येतो. १० रुपये आणि २० रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी साधारण ९५ पैसे खर्च होतात.
जुन्या नोटांचं काय केलं जातं?
काही काळानंतर नोटा फाटतात किंवा खराब होतात. अशा वेळी आरबीआय आपल्या 'स्वच्छ नोट धोरणा'अंतर्गत जुन्या नोटा परत घेऊन त्या नष्ट करते आणि त्यांच्या जागी नवीन नोटा जारी करते. नोटांप्रमाणेच नाण्यांची छपाई मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा येथील विशेष टांकसाळीमध्ये केली जाते. ५०० रुपयांची नोट ही केवळ कागदाचा तुकडा नसून ती एक वैज्ञानिक आणि सुरक्षित प्रक्रियेचा परिणाम आहे, ज्यामागे कडक सुरक्षा यंत्रणा कार्यरत असते.
Web Summary : RBI reveals ₹500 note's printing cost is ₹2.29. Notes are printed in four high-security presses, managed by SPMCIL and BRBNMPL. RBI decides printing volume, design, material; old notes are destroyed under clean note policy. Coins are minted in Mumbai, Hyderabad, Kolkata, Noida.
Web Summary : आरबीआई ने बताया ₹500 का नोट छापने का खर्च ₹2.29 है। नोट चार उच्च-सुरक्षा प्रेस में छपते हैं, जिनका प्रबंधन एसपीएमसीआईएल और बीआरबीएनएमपीएल करते हैं। आरबीआई मुद्रण मात्रा, डिजाइन, सामग्री तय करता है; पुराने नोट नष्ट किए जाते हैं। सिक्के मुंबई, हैदराबाद, कोलकाता, नोएडा में बनते हैं।