शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:32 IST

Leopard Attack 8-year-old boy: कसारा जवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथील जंगलात रानमेवा गोळा करणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककसारा: कसारा जवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथील जंगलात रानमेवा गोळा करणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा भागा आगिवले असे मृत मुलाचे नाव आहे. कृष्णा जंगलात झाडावरील आंबे आणि करवंदे गोळा करीत होता. त्याच वेळी जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कृष्णावर झडप घातली. या झटापटीत बिबट्याने फरपटत नेलेल्या कृष्णाचा मृत्यू झाला.

अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली होती. मात्र, कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने अखेर एका निष्पाप मुलाचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आईवर जबाबदारी मृत झालेल्या कृष्णाला वडील नाहीत. त्यामुळे घरची जबाबदारी कृष्णाच्या आईवर आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा, यासाठी कृष्णाची आई गुलाबीबाई या आळे फाटा येथे कांदे काढायच्या कामासाठी रोजंदारीवर कामाला गेल्या होत्या. चार तास मृतदेह पडून सकाळी आठ वाजता घटनेची माहिती स्थानिक वनविभागाला दिल्यानंतरही दुपारी १२ पर्यंत वनकर्मचारी घटनास्थळी दखल न झाल्याने मृतदेह उन्हात चार तास पडून होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

रेस्क्यू पथक दाखल

शहापूर : बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष रेस्क्यू पथक दाखल झाल्याची माहिती शहापूरचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा यांनी दिली. मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Kills 8-Year-Old Boy in Kasara-Kalbhonde Area

Web Summary : An eight-year-old boy died in a leopard attack near Kasara while collecting fruits. Locals allege delayed response from forest officials despite prior warnings. The state government announced financial aid of ₹25 lakh for the grieving family. Rescue team deployed.
टॅग्स :Leopard Attackबिबट्याचा हल्लाleopardबिबट्या