शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 11:27 IST

मेरठमधील बहुचर्चित ‘निळा ड्रम’ हत्याप्रकरणातील आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगी, तिचा प्रियकर साहिल शुक्ला आणि आपल्या सहा महिन्यांच्या मुलीसह न्यायालयात हजर झाली.

मेरठमधील बहुचर्चित ‘निळा ड्रम’ हत्याप्रकरणातील आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगी, तिचा प्रियकर साहिल शुक्ला आणि आपल्या सहा महिन्यांच्या मुलीसह न्यायालयात हजर झाली. याच दरम्यान हत्या झालेल्या सौरभ राजपूतची आई रेणू देवी न्यायालयात ढसाढसा रडल्या. त्यांचा आक्रोश कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

रेणू देवी रडत वारंवार म्हणत होत्या, "माझ्या मुलाला मारून टाकलं... तो दरमहा ५० हजार रुपये द्यायचा. हत्या करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे." मुस्कानच्या कुटुंबातील सदस्यही या प्रकरणात सामील असून पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुस्कानच्या कुशीत सहा महिन्यांची मुलगी

पांढरा टी-शर्ट आणि टोपी घातलेला साहिल आणि चेहऱ्यावर काळा मास्क लावलेली मुस्कान पोलीस गाडीतून खाली उतरले. मुस्कानच्या कुशीत सहा महिन्यांची मुलगी होती. दोघांनाही कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयात आरोपांच्या आधारे दोघांनाही ३२-३२ प्रश्न विचारण्यात आले. साहिलने आपल्या बाजूने साक्षीदार सादर करण्याची परवानगी मागितली, तर मुस्कानने सर्व आरोप फेटाळून लावले.

आरोपींना फाशी देण्याची मागणी

सौरभची आई रेणू देवी आणि भाऊ राहुल देखील कोर्टात पोहोचले होते. आईने आरोपींना फाशी देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आणि आपल्या मुलाची निर्घृण हत्या झाल्याचे सांगितले. मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्ला याच्यासोबत मिळून पती सौरभ राजपूतची हत्या केली, मृतदेहाचे तुकडे केले आणि ते निळ्या रंगाच्या ड्रममध्ये भरले. पोलिसांनी १९ मार्च २०२५ रोजी दोघांना अटक केली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : "Even with 50,000, my son was killed": Mother's cry.

Web Summary : In the 'Blue Drum' murder case, the victim's mother, Renu Devi, wept in court, demanding the death penalty for her son's killers. She alleged her son was killed despite providing money, accusing the wife's family of involvement. The accused appeared in court with their child, denying charges.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूCourtन्यायालय