By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:54 IST
1 / 11रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात रितेशला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. 2 / 11'राजा शिवाजी' सिनेमाचं दिग्दर्शनही रितेशनेच केलं आहे. या ऐतिहासिक सिनेमात बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार आहे. 3 / 11या सिनेमात रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख राणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. 4 / 11अभिनेता अभिषेक बच्चन छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये त्याची झलक पाहायला मिळाली. 5 / 11अभिनेत्री भाग्यश्री माँसाहेब जिजाऊंच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे. 6 / 11'राजा शिवाजी' सिनेमात अफजलखानच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त दिसणार आहे. 7 / 11या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन बडी बेगमची भूमिका साकारताना दिसणार आहे. 8 / 11बॉलिवूड अभिनेता फरदीन खानही 'राजा शिवाजी' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तो शाहजहानच्या भूमिकेत आहे. 9 / 11अभिनेते बोमन इराणी 'राजा शिवाजी' सिनेमात पीरबाबा ही भूमिका साकारणार आहेत. 10 / 11'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानही दिसणार असल्याची चर्चा आहे. सलमान खान जिवा महालाची भूमिका साकारणार आहे. 11 / 11'राजा शिवाजी' सिनेमा येत्या १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.